नाशिक : वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा; वन्यप्राण्यांची भटकंती रोखण्याचा प्रयत्न 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

नाशिक : वन्यजीवांसाठी कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा; वन्यप्राण्यांची भटकंती रोखण्याचा प्रयत्न

अपुऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली असून, शासनाने जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत.

प्रतिनिधी

हारून शेख

लासलगाव : अपुऱ्या पावसामुळे नाशिक जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वाढू लागली असून, शासनाने जिल्ह्यातील १४ तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले आहेत. ऑक्टोबर महिन्यातच पाणीटंचाईची चिन्हे दिसू लागल्याने ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोत आटण्याची शक्यता वाढली आहे. याचा फटका वन्यजीवांना बसू नये आणि त्यांना पाण्याच्या शोधात मानवी वस्त्यांकडे धाव घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी वन विभागाने कृत्रिम पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरण्याची व्यवस्था सुरू केली आहे.

नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्यास बिबटे, हरीण, ससे, मोर, कोल्हे, लांडगे आणि अन्य वन्यप्राण्यांना पाण्यासाठी जंगलाबाहेर भटकावे लागू शकते. अशा वेळी मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढण्याची शक्यता असते. ही परिस्थिती टाळण्यासाठी वनक्षेत्रातील पाणवठे भरून ठेवण्यावर वन विभागाकडून भर दिला जात आहे. मालेगाव वनपरिक्षेत्रातील निंबायती येथे चार, कंक्राळे येथे दोन, दहीदी येथे दोन, तर पोहाणे येथे दोन कृत्रिम पाणवठे आहेत. सटाणा वनपरिक्षेत्रातही विविध ठिकाणी कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले असून, टँकरच्या मदतीने त्यात पाणी सोडले जात आहे.वनक्षेत्रातील नैसर्गिक जलस्रोतांचे संवर्धन करणे, अस्तित्वातील पाणवठ्यांमधील गाळ काढणे आणि गरजेनुसार नियमित पाणी भरणे आवश्यक आहे. दुष्काळाच्या काळात या उपाययोजनांमुळे वन्यजीवांना जंगलातच पाणी उपलब्ध होण्यास मदत होऊ शकते, असे वन्यजीव अभ्यासकांनी नमूद केले.

१८ नवीन पाणवठे

चांदवड आणि वडनेरभैरव परिसरातील लोढाई माता डोंगर, धोंडबाई, गोहरण, परसूल, राजदरवाडी, दिघवद, कानडगाव, रायपूर, कुंदलगाव आणि एरंडगाव येथेही पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी भरले जात आहे. ज्या ठिकाणी कृत्रिम पाणवठे उपलब्ध नाहीत, तेथे सिमेंटची भांडी, ड्रम आणि अन्य पात्रांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी आणि बाऱ्हे परिसरात १८ नवीन पाणवठे तयार करण्यात आले आहेत.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : अपघाताचे सत्य समोर येईपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवणार; जय पवार यांची भूमिका, CID तपासाला गती देण्याची मागणी

मतवारी दुष्काळाची! आता वेळ नाही, बांबू हाच पर्याय; बांबूपासून जवळपास दोन हजार प्रकारच्या वस्तूंची निर्मिती

Pune : गांधी हत्येनंतर संघावर बंदी; सावरकरांच्या नातलगांची न्यायालयात साक्ष

Mumbai : विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांचे टॅब द्या! भाजपची महापालिकेकडे मागणी

मुरबाड : काळू धरण जनतेसाठी की अदानीच्या विद्युत प्रकल्पासाठी? जमीन व्यवहारांच्या चौकशीची शेतकऱ्यांची मागणी