मंत्री गिरीश महाजन संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या कामांचे बनावट टेंडर; ५०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड; मंत्री महाजन यांच्याकडून कारवाईचे आदेश

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली ठेकेदारांना बनावट टेंडर देण्याचा उदयोग सुरू झाला असून यात ४०० ते ५०० कोटींचा गंडा घातला गेल्याचे कळते.

Swapnil S

जळगाव : नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी विविध वस्तूंचा पुरवठा करण्याच्या नावाखाली ठेकेदारांना बनावट टेंडर देण्याचा उदयोग सुरू झाला असून यात ४०० ते ५०० कोटींचा गंडा घातला गेल्याचे कळते. कुंभमेळ्याचे कोणतेही टेंडर हे ऑफलाइन दिले गेले नसतांना हे बनावट टेंडर ऑफलाइन दिले गेले असून यात चार जणांचा सहभाग असल्याचे कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी सांगितले. या बाबतची बनावट वर्कऑर्डरच पत्रकारांना दाखवत या प्रकरणी पोलिसांना तक्रार देण्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले.

नाशिक येथे होत असलेल्या कुंभमेळ्याची युद्धपातळीवर तयारी सुरू असून कामाच्या वर्क ऑर्डर या ऑनलाइन पद्धतीने दिल्या जात आहेत. तरीही आगामी कुंभमेळ्यासाठी पोलिसांना विविध वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी तसेच अन्य वस्तू पुरवण्यासाठी ऑफलाइन पद्धतीने टेंडर काढले तसेच नाशिक आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि कुंभमेळा आयुक्त श्री. सिंग यांच्या नावाने बनावट वर्क ऑर्डर तयार करून ठेकेदारांना दिली. फसवणूक झालेल्या काही ठेकेदारांनी थेट ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन या बाबतची तक्रार केली. मंत्री गिरीश महाजन यांनी पोलीस आणि संबंधित प्रशासनाला या बाबत तात्काळ कारवाईचे आदेश दिले.

पत्रकार परिषदेत बनावट वक्र ऑर्डर दाखवत गिरीश महाजन म्हणाले की, या नाशिक कुंभमेळ्याच्या नावाने जामनेर येथील दोन जळगावचा एक तर धुळ्याचा एका अशा चार व्यक्तींनी बनावट ऑर्डर आहे.

क्यूआर कोड नसल्याने शंका

जामनेर शहराचे नाव वापरून हे बनावट टेंडर वाटले गेले . शासनाच्या पत्रांवर नियमानुसार क्यूआर कोड असतो. या ऑर्डर्सवर हा कोड नसल्याने काहींना शंका आली आणि हे भिंग फुटले. शासनाने एकही ऑफलाइन टेंडर काढलेले नाही हे गिरीश महाजन यांनी स्पष्ट करत या संबंधितांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

"आंदोलन होणारच"; जंतर-मंतरवरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यावरही अभिजीत दिपके ठाम, म्हणाले - 'तरुणांची भीती...

Nana Patekar Passes Away : 'नानाने माझा जीव वाचवला'; अशोक सराफ यांनी सांगितला भावूक प्रसंग

क्रिकेटसाठी कल्याणहून रत्नागिरीला पोहोचले, पण सामना संपल्यानंतर मृत्यूने गाठले; डोहात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू

'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! मुंबई, रायगडमध्ये आज उष्णतेची पहिली लाट; ‘यलो अलर्ट’ जारी, कोकणासह ठाणे-पालघरही तापणार

वाढत्या उष्म्याने ठाणे तापले; पाखरांची तहान वाढली, ३६-३७ अंशांचा पारा, मध्यरात्रीही ३०-३१ अंशांची धग