महाराष्ट्र

Nashik News: सरन्यायाधीशांचे कोर्ट दाखवत डिजिटल अरेस्ट; दोन वृद्धांना तब्बल ६.७५ कोटींना चुना

आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट करत दोन ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल ६.७५ कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गंभीर बाब म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करत असल्याचे भासवण्यात आले.

Krantee V. Kale

नाशिक : आर्थिक गैरव्यवहार आणि अश्लील फोटो व्हायरल झाल्याचे सांगत डिजिटल अरेस्ट करत दोन ज्येष्ठ नागरिकांकडून तब्बल ६.७५ कोटी रुपये उकळल्याची धक्कादायक घटना शहरात उघडकीस आली आहे. यापैकी एकाला सहा कोटींना तर दुसऱ्याला ७२ लाखांचा चुना लागल्याने खळबळ उडाली आहे. यामधील गंभीर बाब म्हणजे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करत असल्याचे भासवण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, पहिल्या घटनेत गंगापूर रोड परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाला व्हिडीओ कॉल आला. त्याच्या सिमकार्डच्या माध्यमातून अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल झाल्याचे त्यास सांगण्यात आले. शिवाय, या मुद्द्यावर त्यास सर्वोच्च न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे धमकावण्यात आल्याने वृद्ध व्यक्ती घाबरली. त्या परिस्थितीचा फायदा उचलून त्याला सहा कोटी रुपये ट्रान्सफर करायला भाग पाडले. दुसऱ्या घटनेत तुमच्या आधारकार्डवरून क्रेडिट कार्ड इश्यू झाले असून त्या माध्यमातून गैरव्यवहार झाला आहे अशी भीती दाखवत अनिल लालसरे यांना ७२ लाखांना गंडा घालण्यात आला. दंड न भरल्यास सीबीआय पथक अटक करून दिल्लीला नेईल, अशी धमकी या वृद्धास देण्यात आली. त्यामुळे लालसरे यांनी ७२ लाख रुपये आरटीजीएस पद्धतीने जमा करून फसवणूक करवून घेतली. दोन्ही प्रकरणी सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरन्यायाधीशांच्या कोर्टात ऑनलाइन हजर केल्याचे भासवले

या दोन्ही घटना वेगवेगळ्या व्यक्तींबाबत घडल्या असल्या तरी त्यामधील समान धागा म्हणजे त्यांना देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात ऑनलाइन हजर करत असल्याचे भासवण्यात आले आणि भीती दाखवून हे पैसे उकळण्यात आले. घाबरलेल्या या दोन ज्येष्ठ नागरिकांना भामट्यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून पैसे भरण्यास भाग पाडले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

‘आयआयटी’चे हवामान शास्त्रज्ञ अंशुमन मोदी यांचा आरोप; मुंबईच्या अतिखराब हवेला बांधकाम, वाहन प्रदूषण जबाबदार

महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकींचा विद्रूप चेहरा

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

डिसेंबर महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य