नाशिक धर्मांतर प्रकरण : गुगल सर्चमुळे भांडाफोड 
महाराष्ट्र

नाशिक धर्मांतर प्रकरण : गुगल सर्चमुळे भांडाफोड

बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी ५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे.

Swapnil S

नाशिक : बहुराष्ट्रीय कंपनीतील अविवाहित तरुणीवर बलात्कारासह तिच्या धर्मांतराच्या प्रयत्नातील संशयितांनी पीडितेचे ‘हानिया’ असे नामांतर करण्यासाठी ५ एप्रिल २०२५ म्हणजे एक वर्षापूर्वी इंटरनेटवर नावाचा शोध घेतल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे स्वतःकडे घेत त्यांनी नामांतर करून तिच्या बदललेल्या नावे नऊ हजार रुपयांची ‘जकात’ भरल्याचे स्पष्ट झाले. याबाबत न्यायालयात ‘एसआयटी’ने पुरावे दिले आहेत.

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यांत अविवाहित पीडितेच्या फिर्यादीवरून दानिश शेख, तौसिफ अत्तार, निदा खान यांच्यावर गुन्हा नोंद आहे, तर छत्रपती संभाजीनगरातील ‘एमआयएम’चा नगरसेवक मतीन पटेल, घरमालक हानिफ शेख यांना शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने सहसंशयित केले आहे. मतीनने निदाला हानिफचे घर उपलब्ध करून देत आश्रय दिला होता. या गुन्ह्यातील संशयित दानिश याला काही दिवसांपूर्वी मालेगावच्या ‘इस्लाम पार्टी’ने पाठिंबा दिला होता. पार्टीचे संस्थापक अध्यक्ष व माजी आमदार आशिफ शेख यांनी दानिशला वकील व कायदेशीर मदत पुरवली आहे. त्यानंतर खटल्याची दुसरी सुनावणी २२ जून नाशिक रोड न्यायालयात झाली. निदाचा वैद्यकीय अहवाल मागवण्याबाबत अर्ज निदाच्या वकिलांनी सादर केला.

पंधराशे पानांचे दोषारोपपत्र

कारागृहात असलेली निदा गर्भवती असून तिच्या शरीरातील लोह कमी झाले आहे. निदासह दानिश शेख व तौसिफ अत्तार यांचा मुक्काम नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात आहे. या प्रकरणात तब्बल पंधराशे पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग