नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला 
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

नाशिक टीसीएसच्या नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळला आहे.

Swapnil S

नाशिक टीसीएसच्या नाशिक युनिटमधील कथित लैंगिक छळ आणि जबरदस्ती धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानचा अटकपूर्व जामीन अर्ज नाशिक न्यायालयाने फेटाळला आहे.

सरकारी पक्षाने न्यायालयात सांगितले की, गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून आरोपी ही मुख्य व्यक्तींमध्ये समाविष्ट आहे. त्यामुळे तिची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. यासंदर्भात सरकारी वकील अजय मिसर यांनी माहिती देताना सांगितले की, जामीन अर्ज फेटाळण्यात आला असून सविस्तर आदेश लवकरच उपलब्ध होणार आहे. एफआयआरनुसार, निदा खान हिने महिला कर्मचाऱ्यांना इस्लामिक परंपरेनुसार वेशभूषा आणि वर्तन करण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे. तिने गर्भवती असल्याचे कारण देत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. दरम्यान, पोलिसांकडून तिचा महाराष्ट्रातील विविध भागांत शोध सुरू आहे.

या प्रकरणाचा तपास नाशिक पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असून, आतापर्यंत नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका महिला ऑपरेशन्स मॅनेजरसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनीने यापूर्वीच निवेदन जारी करून कोणत्याही प्रकारच्या छळवणूक किंवा दबावाबाबत 'झिरो टॉलरन्स' धोरण असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारत धर्मनिरपेक्षच! ‘दिया’ची चित्रफीत पुनःप्रसारित करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

आंदोलन स्थळी अमर्याद काळ ठिय्या नको; इतरांनाही निदर्शनांचा घटनात्मक अधिकार, सुप्रीम कोर्टाचे निरीक्षण

Mumbai : पालिका आयुक्तांवर कारवाईचा बडगा

५० कोटी देशवासीय गरिबीतून बाहेर; पंतप्रधानांचा दावा; पुणे मेट्रो-३चे उद्घाटन

Diwali 2026 : कमी वेळेत घर सजवण्याचा नवा ट्रेंड; सजावटीसाठी प्लास्टिकच्या रंगीबेरंगी स्टिकरना पसंती, सजावटीला आधुनिक पर्याय