नेपाळमध्ये तरुणांचे हिंसक आंदोलन 
महाराष्ट्र

नेपाळमध्ये अडकले ४४ नाशिककर पर्यटक; कळवण तालुक्यातील ४० तर नाशिकमधील ४ जण संकटात!

नेपाळमध्ये जेन झेड तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील १५० पेक्षा जास्त पर्यटक (ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ६५ पर्यटक) अडकले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ४४ पर्यटकांचा समावेश आहे.

Krantee V. Kale

नाशिक : नेपाळमध्ये जेन झेड तरुणांच्या हिंसक आंदोलनानंतर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्रातील १५० पेक्षा जास्त पर्यटक (ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ६५ पर्यटक) अडकले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील ४४ पर्यटकांचा समावेश आहे. प्रशासकीय आकडेवारीनुसार, जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील ४० आणि नाशिकमधील चार पर्यटक नेपाळमध्ये अडकले आहेत. सर्व जण सुरक्षित असल्याची माहितीही प्राप्त झाली आहे.  राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्या पर्यटकांच्या मदतीसाठी प्रयत्नशील आहेत.

भारताबाहेर जी प्रमुख पर्यटनस्थळे आहेत, त्यामध्ये नेपाळचा समावेश आहे. दरवर्षी लाखो भारतीय नेपाळला पर्यटनासाठी जातात. आता मोठ्या संख्येने तिकडे पोहचलेल्या भारतीयांना अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. नेपाळच्या बहुतांश भागात जाळपोळ, तोडफोड अशा आक्रमक घटना घडताना दिसत आहेत. नेपाळमध्ये सुरू असलेल्या राजकीय अस्थिरता आणि हिंसक आंदोलनामुळे राज्यातील १५० पर्यटक तिथे अडकले आहेत. यात कळवणमधील ४० आणि नाशिकच्या अंबड परिसरातील पर्यटकांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. सर्व पर्यटक गेल्या दिवसांपासून हॉटेलमध्ये थांबले असून नेपाळमधील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भारत सरकारकडे मदतीची विनंती केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रीय..

दरम्यान, नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या परतीच्या प्रवासासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रीय झाला आहे. तिथे अडकलेले पर्यटक हॉटेलमध्ये सुरक्षित असले तरी त्यांची सुरक्षितता आणि परतीचा प्रवास याबाबत आम्ही नेपाल परराष्ट्र मंत्रालयाच्या सातत्याने संपर्कात असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली. नाशिकच्या पर्यटकांपैकी गोसावी कुटुंबीयांनी आपल्याशी संपर्क साधल्याची माहितीही त्यांनी दिली. यासंदर्भात राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि भारतीय दूतावास अडकलेल्यांना भारतात परत आणण्याबाबत प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

नाशिकचे पर्यटक उद्या परतणार ?

नेपाळमध्ये अडकलेल्या नाशिकमधील चार जणांची नावे आपत्ती व्यवस्थापनाला प्राप्त झाली आहेत. त्यानुसार गेल्या ७ सप्टेंबर रोजी तिथे पोहचलेल्यात रामगिरी गोसावी, मंगला गोसावी, भास्कर आहेर आणि सुनिता आहेर अशी त्यांची नावे आहेत. या सगळ्यांकडे १२ सप्टेंबरची परतीच्या प्रवासाची तिकिटे आहेत. तथापि, त्यांना विमानतळावर सुरक्षित येण्याजोगी परिस्थिती असेल का, यावर त्यांचे परतणे निश्चित होणार आहे. कळवण येथील पर्यटकांच्या बाबतीत मात्र अपेक्षित माहिती मिळू शकली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा सीपी राधाकृष्णन यांनी दिला राजीनामा; गुजरातच्या राज्यपालांकडे अतिरिक्त कारभार

Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान मॅच रद्द करण्यास SC चा नकार, याचिकेवर तातडीने सुनावणीची मागणी फेटाळली

बॉम्बे नाही, मुंबईच! कपिल शर्माला मनसेची सक्त ताकीद; नाहीतर...

शाहरुख खान-दीपिका पदुकोण यांना मोठा दिलासा; राजस्थान उच्च न्यायालयाकडून FIR चौकशीला स्थगिती

बीड : विवाहबाह्य संबंध, बक्कळ पैशांची मागणी; अखेर माजी उपसरपंचाने संपवलं आयुष्य, प्रेयसी नर्तिकेला अटक