महाराष्ट्र

निराधार दुर्गांची जीवनभरारी! जिद्द आणि अपार मेहनतीचे फळ; प्रभारी मुख्याध्यापकपदी पोहोचलेली नांदेडची'अच्युता'

Navratri 2024 : वडिलांचे छत्र गमावल्यानंतर बालगृहाची वाट धरलेल्या भावंडांपैकी अच्युता जाधव हिने शिक्षणाचे एक एक टप्पे पूर्ण करीत प्रभारी मुख्याध्यापकपदापर्यंत मजल मारली ती केवळ जिद्द व अपार मेहनतीच्या जोरावर.

Swapnil S

गायत्री पाठक-पटवर्धन/पुणे: वडिलांचे छत्र गमावल्यानंतर बालगृहाची वाट धरलेल्या भावंडांपैकी अच्युता जाधव हिने शिक्षणाचे एक एक टप्पे पूर्ण करीत प्रभारी मुख्याध्यापकपदापर्यंत मजल मारली ती केवळ जिद्द व अपार मेहनतीच्या जोरावर.

वडिलोपार्जित संपतीच्या वादातून वडील गमावलेल्या अच्युत्ता व तिच्या दोन बहिणी व भावाला सुरक्षित वातावरण मिळावे म्हणून नांदेड येथील बालसुधारगृहात दाखल केले. तेव्हा अच्युताचे वय होतं ३ वर्षाचे. सर्वात धाकटी बहीण १ वर्षांची होती. तर आठ वर्षांनी मोठ्या असलेल्या भावाला वेगळ्या बालगृहात दाखल करण्यात आले. एका वर्षातच मग तिघी बहिणींना सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाच्या अहिल्यादेवी बालगृहात दाखल केले.

अच्युता जाधव म्हणते, ‘आमचं एकत्रितपणे नांदत असलेलं कुटुंब वडिलांच्या मृत्यूमुळे विखुरलं गेलं. आम्ही भावंडे भीतीच्या छायेखाली होतो. त्यामुळे खूप तणावाखाली वावरत होतो. त्यावेळी आम्हा भावंडांना केवळ सुरक्षित वातावरण मिळावं, म्हणून आमच्या आईने बालगृहात दाखल केले. जेव्हा बालगृहात दाखल झालो तेव्हा मला व माझ्या बहिणीला भावाला घरची खूप आठवण यायची. जेवणात अभ्यासात वगैरे कशातच लक्ष लागायचं नाही. मी जशी बालगृहात दाखल झाले तसं मला थेट एकदम दुसरीतच प्रवेश मिळाला. कारण आमचं बालगृहाचीच स्वतंत्रपणे शाळा असल्याने आम्हाला शाळेतही लगेच प्रवेश मिळाला. लहानपणी कुटुंबावर गुदरलेल्या परिस्थितीमुळे मी चांगले शिकायचे, मोठं व्हायचं हे ठरवले होते. अर्थात माझ्या शालेय शिक्षणावर माझ्या शिक्षकांचे खूप मोठे श्रम आहेत. कारण मला त्यांनी स्वतंत्ररित्या शिकवल्यामुळे मी वयाने लहान असूनही तिथल्या शिक्षकांनी अभ्यासात पुढे आणले. ६ वी पासून ते १२ पर्यंत मग मी शाळेतील पहिला क्रमांक सोडला नाही. अच्युता अभ्यासात जशी हुशार होती तशी ती शाळेतील विविध उपक्रमातही सहभागी व्हायची. गाणे, खेळ, वक्तृत्व अशा सगळ्या गोष्टीत तिचा शाळेतील सहभाग अग्रेसर होता. तिचे हे गुण हेरून १२ वी नंतर शाळेतील उप-मुख्याध्यापकांनी आपल्या मुलासाठी ही मुलगी योग्य आहे असा प्रस्ताव संस्था चालकांपुढे मांडला. अर्थात अच्युताची आई एकटीच गावी राहत असल्याने संस्था चालकांनी आईपुढे हा प्रस्ताव नेला. पण आईची एकच अट होती की तिला पुढे शिकवणार असाल तर हे स्थळ चालेल. एव्हाना मोठ्या बहिणीचे नववीत असतानाच जबाबदारीच्या चिंतेने लवकर लग्न करूनं दिले होते. पण आपल्या मुलींना शिकवायला पाहिजे तर त्या स्वतःच्या पायावर उभ्या राहतील ही जाणीव झाली. त्यामुळे आईने या स्थळाला पसंती दिली. अच्युताचे लग्न झाले. सासऱ्यांच्या घरचे वातावरण शैक्षणिक होते. अच्युताचा नवरा शाळेत ग्रंथपाल म्हणून तर सासरे उपमुख्याध्यापक.

अच्युताने BA DED केले आणि तिच्या अभ्यासाच्या जोरावर तिला हिंगोली जिल्ह्यातील जिल्हा परिषदाच्या शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून रुजू झाली. अच्युताचा खरा संघर्ष ती शिक्षिका म्हणून जेव्हा रुजू झाली तेव्हा चालू झाला. नांदेडपासून रोजचा तिला तिच्या शाळेपर्यंत १८० किलोमीटरचा रोजचा प्रवास करायला लागायचा. सगरोळीत सासू सासरे, नांदेडच्या शाळेत नवरा काम करत असल्याने नांदेडमध्ये नवरा व तिची दोन लहान मुले आणि तिची १८० किलोमीटर लांब असलेली शाळा. असा तिचा संसार सुरु झाला. अच्युत्ता पहाटे जी घरातून जायची ती रात्रीच घरी यायची. रोजचा ६ तास प्रवास करून सहा तासांची शाळा, मग मुलं संसार हे शिवधनुष्य तब्बल सात वर्षे पेललं. मुलांकडे आता दुर्लक्ष व्हायला लागले म्हणून आजी आजोबांकडे मुलं राहायला लागली. अच्युताला मुलांना, नवऱ्याला एकाच वेळी भेटणं ही तारांबळ होत असे. पण अच्युताने अशा ही परिस्थितीत हार न मानता, स्वतःचे मानसिक संतुलन ढळू न देता आपल्या छंदाना, हिंदी विषयातील स्कॉलरशिप अभ्यासाला, चित्रकलेच्या, गायनाच्या परीक्षा वेळ दिला. इतकंच नाही तर तिच्या या कष्टाचे तिला फळही मिळाले. अच्युताला नुकतेच ‘विशेष शिक्षिका’ म्हणून पदही मिळाले. त्यामुळे अच्युताची आज खेडेगावातील शाळेत तात्कालिक वेळेस प्रभारी मुख्याध्यापक म्हणून पदभार सांभाळावा लागतो. अच्युताने शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना विविध स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसवून शाळेला अव्वल क्रमांक मिळवून दिला. तिचा एक विद्यार्थी इन्कम टॅक्स ऑफिसर झाला तेव्हा त्याने पहिला फोन आपल्या बाईना म्हणजे अच्युताला लावला. हे सांगताना अच्युताच्या गहिवरून आले होते.

अच्युता सांगते, ‘माझ्या शाळेतील सतरा वर्षांच्या नोकरीत चार पाच ठिकाणी विदर्भातील विविध भागात बदल्या झाल्या. पण त्या मी प्रामाणिकपणे सांभाळू शकले कारण घरातूनच सासू, सासरे, नवरा यांचा मला खूप मोठा सपोर्ट होता. माझे हे कष्ट, जिद्द पाहून प्रसंगी माझ्या नवऱ्याने त्यांची नोकरी सोडली व त्यांनी पूर्णवेळ मुलांची जबाबदारी स्वीकारली. आता शाळा ही तासाभराच्या अंतरावर आल्याने माझे मिस्टर जवळपास च्या खेडेगावात सामाजिक चळवळींमध्ये सहभागी होतात. घर, मुले सांभाळून.

अच्युताचे लहानपणी विखुरलेलं कुटुंबही एकत्रित आलं. अच्युताच्या लहान बहिणीनेही MA DED पूर्ण केले व स्वतंत्र पणाने खासगी क्लासेस घेते. तर मोठा भाऊ BHMS होऊन चांगला डॉक्टर झाला आणि एकट्या आईला सांभाळू लागला. आईचे, माझे, भावाचे कष्ट फळाला आले हे पहायला आज आई नाही, ती मी DED करतानाच वारली होती. आम्ही भावंडे मात्र पुन्हा एकत्र आलो. आता एकूणच कुटुंबात कुणाचं विषयी कसलीच कटुता नाही, हेच काय ते समाधान.

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश