NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

NCMC कार्ड नोंदणी व वितरण प्रक्रियेत बदल

एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे.

Swapnil S

मुंबई : एसटी महामंडळाच्या एनसीएमसी कार्ड प्रकल्पांतर्गत अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू आहे. प्रवाशांना सवलतीचा लाभअधिक सुलभपणे मिळावा यासाठी महामंडळाने काही महत्त्वाचे बदल केले असून, संबंधित लाभार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

ज्या अमृत ज्येष्ठ नागरिक लाभार्थ्यांच्या बायोमेट्रिकमध्ये बोटांचे ठसे जुळत नाहीत, अशा लाभार्थ्यांसाठी २१ सप्टेंबर पासून आधारकार्ड संलग्न भ्रमणध्वनी क्रमांकावर प्राप्त ओटीपीच्या आधारे एनसीएमसी कार्डची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे बायोमेट्रिक प्रमाणीकरणात

अडचण येणाऱ्या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. २१ सप्टेंबरपासून हरवलेले अथवा चोरीला गेलेले एनसीएमसी कार्ड ब्लॉक करून १९९ शुल्क भरून नव्याने नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

१९ सप्टेंबरपर्यंत एनसीएमसी कार्डसाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना २५ सप्टेंबर २०२६ पासून कार्ड वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. १६ सप्टेंबरपासून कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला सवलतधारक प्रवाशांना क्यूआर कोड असलेली एनसीएमसी पावती देण्यात येणार आहे. ही पावती एसटीच्या ईटीआयएम मशीनवर स्कॅन केल्यानंतर सवलतीचे तिकीट मिळणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI तिकीट, पास खरेदीवर प्रवाशांना भुर्दंड; ५.९० रुपये अधिक मोजावे लागणार

समृद्धी ते पुणे ६ तासांच्या पाठलागाचा थरार; १.१३ कोटींचा गुटखा जप्त

Mumbai : आदित्य ठाकरेंना ५०० कोटींची अब्रुनुकसानीची नोटीस; 'मातोश्री' बाहेर हायव्होल्टेज ड्रामा

१९६५ च्या भारत-पाक युद्धाचे हिरो ए. टी. कूक यांचे निधन

Mumbai : मेट्रोच्या कामादरम्यान दुचाकीवर बॅरिकेड कोसळले; विक्रोळीत प्लंबरचा मृत्यू