Karjat : नीट परीक्षेत कमी गुण, तरुणीची आत्महत्या 
महाराष्ट्र

Karjat : नीट परीक्षेत कमी गुण, तरुणीची आत्महत्या

वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेत कमी गुण मिळाल्याने १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Swapnil S

अहिल्यानगर : वैद्यकीय प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या 'नीट' परीक्षेत कमी गुण मिळाल्याने १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. फेरपरीक्षेत अपेक्षित यश न मिळाल्याच्या नैराश्यातून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे तिच्या घरातून मिळालेल्या चिठ्ठीवरून समोर आले आहे.

कर्जत तालुक्यातील जळगाव/जलालपूर गावातील रहिवासी असलेल्या अंकिता सांगळे या तरुणीने २५ जुलै रोजी राहत्या घरी गळफास लावून आपले जीवन संपवले. अंकिताने नुकतीच १२ वीची परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि तिने २१ जून रोजी झालेली नीटची प्रवेश परीक्षा दिली होती.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, घटनेनंतर अंकिताच्या घरातून एक सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे. 'नीट' परीक्षेत कमी गुण मिळाल्याने आपण प्रचंड मानसिक तणावाखाली आणि नैराश्यात असून, याच कारणामुळे आत्महत्या करत असल्याचे तिने या नोटमध्ये नमूद केले आहे. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video