महाराष्ट्र

नववर्षासाठी महाबळेश्वर-पाचगणी हाऊसफुल; 'मिनी काश्मीर'मध्ये पर्यटकांच्या धमालमस्तीला ऊत

महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाणारे येथील महाबळेश्वर-पाचगणी ही दोन्ही निसर्गरम्य पर्यटनस्थळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असतानाच मागील आठवड्यापासून ही दोन्ही शहरे पर्यटकांनी बहरली असून तेथील परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

Swapnil S

कराड : महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' म्हणून ओळखले जाणारे येथील महाबळेश्वर-पाचगणी ही दोन्ही निसर्गरम्य पर्यटनस्थळे नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली असतानाच मागील आठवड्यापासून ही दोन्ही शहरे पर्यटकांनी बहरली असून तेथील परिसरात उत्साहाचे वातावरण आहे. महाबळेश्वरच्या हिरवाईने नटलेल्या निसर्ग सौंदर्याचे पर्यटक मोठ्या प्रमाणात निरीक्षण करत आहेत आणि त्यासोबतच गुलाबी थंडीचा आनंद घेत आहेत तर पांचगणी येथील टेबल लँडवरती घोडेस्वारीसह पॅराग्लायडिंग, घोडागाडी तसेच नौकाविहाराचाही आनंद लुटता येत आहे.

महाबळेश्वर हे प्रत्येक हंगामात पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. नाताळ हंगाम सुरू झाल्यापासून इथल्या हॉटेल्स आणि दुकानदारांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी तयारी केली होती.

देश-विदेशातील पर्यटक महाबळेश्वरच्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. विशेषतः वेण्णा लेक परिसरात नौकाविहारासाठी पर्यटकांची रांगा दिसून येत आहेत.तेथील जलक्रीडा प्रेमींच्या गर्दीमुळे वातावरण जत्रेसारखे झाले आहे.

नववर्ष स्वागतासाठी सजलेल्या बाजारपेठा नववर्षाच्या स्वागतासाठी महाबळेश्वरची बाजारपेठ विद्युत रोषणाईने सजली आहे. बाजारात रंगीबेरंगी दिवे आणि सजावट पर्यटकांचे आकर्षण वाढवत आहेत.विविध पर्यटन स्थळांवर होणाऱ्या कार्यक्रमांसोबतच येथील बाजारपेठेतही खरेदीसाठी मोठी गर्दी आहे.

गुलाबी थंडीचा आनंद महाबळेश्वरची विशेष ओळख म्हणजे इथे मिळणारी गुलाबी थंडी आणि निसर्गाची अद्वितीय शोभा पाचगणी, महाबळेश्वर इथल्या थंड हवेचा आणि निसर्गाच्या देखाव्याचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक इथे येत असतात तसेच, इथे उपलब्ध असलेले विविध हॉटेल्स आणि लॉज पर्यटकांच्या आरामदायक वास्तव्याची काळजी घेत आहेत, असे हॉटेलचालकांनी सांगितले.

महाबळेश्वर हे निसप्रेमींसाठी एक जगप्रसिद्ध ठिकाण ठरत आहे. इथे पर्यटकांना रेटे एल्फिन्स्टन पाईन टीज,धरणे आणि सुंदर वॉटरफॉल्स पहायला मिळतात. तसेच महाबळेश्वरच्या जंगलाच्या वाटांवर चालताना प्रकृतिसोबत एकाग्र होण्याची संधी मिळते. संपूर्ण महाबळेश्वर येथे आलेल्या पर्यटकांसाठी एक नवा अनुभव देतो आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक इथे आनंदाने वेळ घालवित आहेत.

महाबळेश्वर आणि पाचगणीतील वेगवेगळ्या पॉइंट्स,टेबल लँडवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.नववर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स आणि रिसॉर्टमध्ये मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.वाढत्या पर्यटकांमुळे पसरणी घाट ते महाबळेश्वर मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

पाचगणीत पर्यटकांची धमाल मस्ती

पाचगणी येथेही नवीन वर्ष सुरू होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाच थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळख असल्याने पाचगणीही सध्या पर्यटकांनी बहरले आहे.पर्यटक पॅराग्लायडिंग, हॉर्स रायडिंग, घोडागाडी तसेच नौकाविहाराचा आनंद लुटत आहेत. सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक मोठ्या संख्येने महाबळेश्वर आणि पाचगणीत दाखल झाले आहेत. दोन्ही शहरे पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज आहेत. बाजारपेठाही सजल्या असून बाजारपेठेत विद्युत रोषणाईचा झगमगाट पाहायला मिळत आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली