Nashik : कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला NGTची स्थगिती; महापौरांकडून निर्णयाचे समर्थन संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

Nashik : कुंभमेळ्यासाठी वृक्षतोडीला NGTची स्थगिती; महापौरांकडून निर्णयाचे समर्थन

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पुणे खंडपीठाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.

Swapnil S

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वरमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोडीला राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) पुणे खंडपीठाने २८ एप्रिलपर्यंत स्थगिती दिली आहे.

नाशिकचे पर्यावरणप्रेमी मनीष बाविस्कर यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान लवादाने हा निर्णय घेतला. याप्रकरणी नाशिक महानगरपालिकेला २८ एप्रिल रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीत आपली बाजू मांडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी गुरुवारी सांगितले की, महानगरपालिका आपली बाजू लवादासमोर मांडणार आहे. कुंभमेळ्याचे नियोजन आणि शहरातील रस्ते अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे वृक्षतोडीचा निर्णय अचानक घेतलेला नसून सर्व पैलूंचा विचार करूनच घेण्यात आला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. महापौरांनी असा दावा केला की, वृक्षतोड करताना सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जात असून पर्यावरणपूरक उपाययोजनांना प्राधान्य दिले जात आहे.

समर्थनार्थ मुद्दे

शहरात वाहतुकीची कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे, २०१५ ते २०१९ दरम्यान ३१ नागरिकांचा मृत्यू झाला, तर २३ जण जखमी झाले. पोलीस रेकॉर्डनुसार ही मृतांची संख्या ४६ आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे, आदी मुद्दे मांडण्यात आले आहेत. आगामी कुंभमेळ्यासाठी सुमारे १२ ते १५ कोटी भाविक नाशिकमध्ये येण्याची शक्यता आहे, त्यासाठी रस्ते रुंदीकरण अपरिहार्य आहे, असे मुद्दे वृक्षतोडीच्या समर्थनार्थ मांडण्यात येत आहेत.

नवी मुंबईला 'धुक्याऐवजी' प्रदूषणाचा विळखा; पहाटे व्यायामाला आलेले नागरिक प्रदूषित हवेत, 'हेल्दी सिटी'च्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

Hartalika Teej 2026 : यंदा हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी; उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या संपूर्ण माहिती