Nashik : निफाडला शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाने आत्महत्या प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Nashik : निफाडला शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाने आत्महत्या

निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी संतू कचरू रायते (५७) यांनी आत्महत्या केली आहे.

Swapnil S

लासलगाव : निफाड तालुक्यातील खडकमाळेगाव येथील प्रगतिशील शेतकरी संतू कचरू रायते (५७) यांनी आत्महत्या केली आहे.

नापिकी आणि वाढत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलले. रायते यांच्या खिशात लासलगाव पोलिसांना एक आत्महत्यापूर्व चिठ्ठी सापडली आहे.

कर्जाचा डोंगर आणि शेतमालाला मिळणारा असमाधानकारक भाव यामुळेच आत्महत्या करत असून यासाठी कुटुंबीयांना दोषी धरू नये, असा उल्लेख या चिठ्ठीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. यात निफाड तालुक्यात भीषण दुष्काळसदृश परिस्थिती असताना प्रशासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त यादीतून तालुक्याला वगळण्यात आले. या निर्णयानंतर काही तास उलटत नाही तोच ही दुर्दैवी घटना घडल्याचे उघड झाले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राज्यात दुष्काळामुळे भाजीपाल्याचे दर दुप्पट; पितृपक्षामुळे भाज्यांची मागणी वाढली

Mumbai : १ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर...CSMT वर ७५ दिवसांचा विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Pune : प्रत्यक्षदर्शींना जिवे मारण्याची धमकी; केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे

Mumbai : ५ ऑक्टोबरपासून बेस्ट मार्गांत बदल; आठ मार्गांचे वातानुकूलित सेवेत रूपांतर

Mumbai : ...तर पैसे परत घेण्याचा अधिकार; उच्च न्यायालयाचा ग्राहकाला दिलासा, बिल्डरांना झटका