नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका; तिन्ही नेत्यांविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट 
महाराष्ट्र

नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका; तिन्ही नेत्यांविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट

भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना बुधवारी कोर्टाने मोठा दणका दिला आहे.

Swapnil S

कुडाळ : भाजपाचे कणकवलीचे आमदार आणि मंत्री नितेश राणे, तसेच प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना बुधवारी कोर्टाने मोठा दणका दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे २६ जून २०२१ रोजी केलेल्या आंदोलनाप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्याबाबत कुडाळ येथील न्यायालयाने या तिन्ही नेत्यांविरोधात अजामिनपात्र अटक वॉरंट बजावले आहे.

२६ जून २०२१ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे झालेल्या ओबीसींच्या आंदोलनात नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर हे भाजपा नेते सहभागी झाले होते. या आंदोलनाप्रकरणी नितेश राणे, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासह निलेश राणे आणि राजन तेली यांच्याविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, या प्रकरणी बुधवारी आज कुडाळ येथील न्यायालयात झालेल्या सुनावणीला निलेश राणे आणि राजन तेली हे हजर राहिले होते. तर नितेश राणे, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्यासह पाच इतर आरोपी गैरहजर राहिले. यावेळी नितेश राणे यांच्या वकिलाने दाखल केलेला विनंती अर्ज फेटाळून लावत कोर्टाने थेट त्यांच्याविरोधात वॉरंट बजावले. तसेच नितेश राणे हे या प्रकरणी कोर्टाने दिलेल्या तारखांना वारंवार गैरहजर राहिल्याने कोर्टाने त्यांच्याविरोधात थेट अटक वॉरंटही बजावले आहे.

जून २०२१ मध्ये जेव्हा हे ओबीसी आंदोलन झाले होते. तेव्हा मोठ्या प्रमाणात जमाव जमवण्यात आला होता. त्यावेळी या आंदोलनात सहभागी असलेल्या नितेश राणेंसह इतर नेत्यांना पोलिसांनी अटकही केली होती. तसेच तेव्हापासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होते. त्याचवेळी प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी संविधान बचाव आंदोलनही केले होते.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन