महाराष्ट्र

"कॅगच्या अहवालातून नितीन गडकरींचा काटा काढण्याचा प्रयत्न", विजय वडेट्टीवारांचा गंभीर आरोप

नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या अहवालाचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असताना कॅगने फक्त...

नवशक्ती Web Desk

कॅगच्या अहवालात मोदी सरकारच्या सात योजनांमध्ये भ्रष्टाचारावरुन ताशेरे ओढले आहेत. कॅगच्या अहवालानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा काटा काढण्याचा प्रयत्न कागच्या अहवालातून केला असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे. आज (१८ ऑगस्ट) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यामांशी बोलत होते.

वडेट्टीवार म्हणाले की, भाजपच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी कॅगच्या अहवालाचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असताना कॅगने फक्त गडकरींवर ताशेरे ओढले आहेत. यातून हे स्पष्ट होतं आहे. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे असं सगळे सांगतात. विकासाची आणि स्वच्छ अशी त्यांची प्रतिमा झाली आहे. त्यामुळे त्यांना बाजुला करून त्यांचं राजकारण संपवायचं हेही एक कारण असू शकतं, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

कॅगच्या अहवालात मोठा भ्रष्टाचार समोर आला असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रस्त्यांच्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे कॅगच्या अहवालावर त्यांची भूमिका काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सगळीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आहे. कॅगच्या अहवालावर केंद्र सरकार काय कारवाई करतं याकडे आमचं लक्ष आहे. असंही वडेट्टीवार म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी