MBBSसाठी साडेचार वर्षांचे शुल्क आकारा; एनएमसीचे वैद्यकीय महाविद्यालयांना निर्देश 
महाराष्ट्र

MBBSसाठी साडेचार वर्षांचे शुल्क आकारा; एनएमसीचे वैद्यकीय महाविद्यालयांना निर्देश

एमबीबीएस अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा असून एक वर्ष आंतरवासिता कालावधी असतो.

Swapnil S

मुंबई : एमबीबीएस अभ्यासक्रम साडेचार वर्षांचा असून एक वर्ष आंतरवासिता कालावधी असतो. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांकडून फक्त शैक्षणिक अध्यापन कालावधीसाठीच म्हणजे साडेचार वर्षांसाठी शुल्क आकारावे, असे निर्देश राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (एनएमसी) सर्व वैद्यकीय महाविद्यालये, संस्था व विद्यापीठांना दिले आहेत.

या नियमाचे पालन न केल्यास संस्था व वैद्यकीय महाविद्यालयांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालये, संस्था, खासगी विद्यापीठे विद्यार्थ्यांकडून पाच वर्ष किंवा साडेपाच वर्षाच्या संपूर्ण कालावधीचे शुल्क आकारतात.

या वैद्यकीय महाविद्यालयांकडून शैक्षणिक अध्यापनाचे साडेचार वर्ष व आंतरवासिताचे एक वर्ष असे साडेपाच वर्षाचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येते. मात्र ही पद्धत एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक संरचनेशी सुसंगत नाही.

Mumbai Rain : मुंबईसह वसई-विरारमध्ये मुसळधार पाऊस; अनेक भागांत पाणी साचलं, ऑरेंज अलर्ट जारी, VIDEO

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला मुंबई पोलिसांचा नकार; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

Rajapur : गणपतीसाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या गाडीला भीषण अपघात; ८-१० जण गंभीर जखमी, वाहनाचा चक्काचूर

माथेरानला मिळणार पाइपलाइनद्वारे गॅस; महानगर गॅसच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

Mumbai : नालासोपाऱ्यात ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; भाविक थोडक्यात बचावले, Video