महाराष्ट्र

पुण्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; होर्डिंग कोसळून पिंपरीत ५ जणांचा मृत्यू

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसाने हजेरी लावली.

नवशक्ती Web Desk

अवकळी पावसात होर्डिंगच्या आश्रयाला गेलेल्या नागरिकांवर होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेत ५ जण ठार झाल्याची घटना पिंपरी-चिंचवडच्या रावेत किवळे परिसरात घडली. या घटनेत आणखी तिघे जण जखमी झाले आहेत.

पिंपरी चिंचवड शहरामध्ये सोमवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह धुवांधार पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बचावासाठी काही नागरिकांनी रावेत किवळे येथील मुंबई-पुणे महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवरील पंक्चरच्या दुकानाजवळ होर्डिंगचा आडोसा घेतला. अचानक यावेळी जाहिरातीचे २ मोठे होर्डिंग वादळी वाऱ्यामुळे खाली कोसळले होर्डिंग कोसळले. त्याखाली ८ जण अडकले. घटनेनंतर तात्काळ देहूरोड पोलीस आणि रावेत पोलिसांच्या पथकाने स्थानिक नागरिक आणि पिंपरी-चिंचवड अग्निशमन दलाच्या मदतीने या लोकांना बाहेर काढले. घटनेत ५ जणांचा मृत्यू, तर १ जण जखमी असल्याचे समजते. मृतांमध्ये ४ महिला आणि १ पुरुषाचा समावेश आहे.

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा

इशाऱ्यानंतर पालिका प्रशासनाचे नमते! फिरत्या शौचालयासह पुरवल्या इतर सुविधा; आंदोलकांसाठी पाण्याचे टँकर्सही अखेर उपलब्ध

Maratha Reservation Protest : मुंबईच्या रस्त्यांवर संगीत, नृत्य आणि कठपुतळीचा नाचही!