श्रीकांत शिंदे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - श्रीकांत शिंदे

महायुतीला जनतेने कौल देऊन नऊ दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याने शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास नाखुश असल्याने या चर्चेला जोर आला होता.

Swapnil S

मुंबई : महायुतीला जनतेने कौल देऊन नऊ दिवस झाले तरी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्री भाजपचाच होणार असल्याने शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास नाखुश असल्याने या चर्चेला जोर आला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्स’वर ट्विट करीत ‘मी उपमुख्यमंत्रीपदाच्या तसेच राज्य सरकारमध्ये कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही’, असे जाहीर केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन ९ दिवसांचा कालावधी उलटला. मात्र, महायुतीतील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर झालेला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच माघार घेतली आहे. तसेच उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास ते नाखूश असल्याचे समजते. मात्र, एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक असून तसा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाला शिवसेनेने सादर केल्याची चर्चा गेले काही दिवस रंगली होती.अखेर श्रीकांत शिंदे यांनी ‘एक्स’वर ट्विट करत ‘मी उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही’, असे स्पष्ट केले आहे.

‘महायुती सरकारचा शपथविधी लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवांचे पीक फोफावले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच बहर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस झळकत आहेत. मात्र यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्रीपदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत’, असे श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले आहे.

राज्यातील मंत्रिपदाच्या शर्यतीतही नाही!

‘लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र, पक्षसंघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतील पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठी मी जोमाने काम करणार आहे’, असे त्यांनी नमूद केले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल