एकनाथ शिंदे  संग्रहित फोटो
महाराष्ट्र

शिंदेंकडून मंत्रिमंडळात नव्या चेहऱ्यांना संधी? अब्दुल सत्तार, संजय राठोड यांचा पत्ता कट होण्याची शक्यता

गेले १२ दिवस वाटाघाटी केल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. गृहमंत्रीपदावर अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे.

Swapnil S

मुंबई : गेले १२ दिवस वाटाघाटी केल्यानंतर अखेर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. गृहमंत्रीपदावर अडून बसलेल्या एकनाथ शिंदे यांनीही उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर सर्वांचे लक्ष लागले आहे ते मंत्रिमंडळ विस्ताराकडे. अनेकांनी आपल्याला मंत्रिपद मिळण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरू केली असून शिंदेंच्या शिवसेनेकडून यावेळी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. शिंदे गटाने आमदारांचे आणि मंत्र्यांचे प्रगती पुस्तक तयार केले आहे. त्यात पाच मंत्री पास झाले असून दोन मंत्री नापास ठरले आहेत. त्यानुसार अब्दुल सत्तार आणि संजय राठोड या माजी मंत्र्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.येत्या १६ डिसेंबरपासून नागपूरमध्ये विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी, मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला १३ ते १४ मंत्रिपदे दिली जाणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेकडून आमदारांचे आणि मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांनीही ‘मंत्रि‍पदे देताना प्रत्येकाचे रिपोर्ट कार्ड असते’, असे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, “प्रत्येकाचे रिपोर्ट कार्ड असते. २०२२ मध्ये आम्ही जे सत्तांतर केले, त्यानंतर माझ्याकडे आरोग्य खाते देण्यात आले. महाराष्ट्राच्या आरोग्य खात्याला मी एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केला. आमच्या महायुतीमधील तिन्ही नेते मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करतील. योग्य वेळी योग्य तो निर्णय घेतील. तसेच मला पुन्हा संधी मिळेल की नाही? हा माझ्या नेत्याचा विषय आहे. ते जी जबाबदारी टाकतील ती जबाबदारी मी पार पाडेन.”

एकनाथ शिंदे यांना मात्र आपल्या मंत्र्यांना मंत्रिपदे देताना मोठी कसरत करावी लागणार आहे. या रिपोर्ट कार्डनुसार पाच मंत्री पास झाले असून अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे नापास झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा मंत्रिपदाचा मार्ग खडतर असल्याचे बोलले जात आहे.

यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, दीपक केसरकर, शंभूराज देसाई, तानाजी सावंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, विजय शिवतारे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता