Nashik : ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामाला मंजुरी; नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांकडून हिरवा कंदील 
महाराष्ट्र

Nashik : ओझर विमानतळाच्या विस्तारीत बांधकामाला मंजुरी; नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांकडून हिरवा कंदील

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम राज्य शासनातर्फे सुरू आहे. या विस्तारीत कामाच्या बांधकामाला नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र ओझर विमानतळावरील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामास वेग येणार आहे.

Swapnil S

लासलगाव : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर येथील विमानतळाच्या विस्तारीकरणाचे काम राज्य शासनातर्फे सुरू आहे. या विस्तारीत कामाच्या बांधकामाला नवी दिल्ली येथील नागरी विमान सुरक्षा विभागाच्या महासंचालकांनी मंजुरी दिली आहे. याबाबतचे पत्र ओझर विमानतळावरील मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांना प्राप्त झाले आहे. या निर्णयामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामास वेग येणार आहे.

नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ओझर विमानतळाचे विस्तारीकरणासाठी ५६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे ओझर विमानतळाच्या प्रवासी क्षमतेत तीनपट वाढ अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर, विमानतळ विस्तारीकरण बांधकामाचा आराखडा मंजुरीसाठी नागरी विमान उड्डाण विभागाकडे सादर करण्यात आला होता. या आराखड्यात नवीन अॅप्रॉनचे बांधकाम, विद्यमान अॅप्रॉनचा विस्तार आणि संबंधित नवीन टॅक्सी वेसाठी संकल्पना/आराखडा आदींचा समावेश आहे.

सुरक्षा नियमांचे पालन करा!

या कामाला आता एरोड्रम सल्लागार समितीने मान्यता दिली आहे. विस्तारीकरणाचे काम करताना सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यासाठी प्रमाणित कार्य पद्धतीचा अवलंब करण्याची सूचना देण्यात आली आहे तसेच विमानांच्या संचालनाच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेली माहिती विमानतळ हवाई वाहतूक सेवेला दररोज कळवावी, असेही या पत्रात म्हटले आहे.

कुंभमेळ्याआधी विस्तारीकरणाचे काम पूर्ण

ओझर विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे कुंभमेळ्यासाठी देश विदेशातून येणाऱ्या भाविकांना जलद प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याबरोबरच जिल्ह्यातील पायाभूत सोयीसुविधांचे बळकटीकरण होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबरच सरकारकडून विस्तारीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे कुंभमेळा सुरू होण्यापूर्वी विमानतळ विस्तारीकरणाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

CJP Protest : रांका, दास यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी; तिहारमध्ये रवानगी, दिपके आक्रमक, म्हणाले - "हिंमत असेल तर...

पत्नीशी वाद टाळण्यासाठी बाल्कनीतून पळण्याचा प्रयत्न जीवावर; २१ व्या मजल्यावरून पडून पतीचा मृत्यू

Bihar Boat Tragedy : गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली नाव उलटली; एकाच कुटुंबातील १३ मुलांचा करुण अंत, VIDEO

Ahmedabad : चनिया चोली घालून महिला पोलिसांचा गरबा; स्त्रियांच्या सुरक्षेसाठी 'तिच्या टीम'ची अनोखी शक्कल

Nalasopara Fire : नालासोपाऱ्यात १४ मजली इमारतीला भीषण आग; दोन महिलांचा मृत्यू, २५ रहिवाशांची सुटका, VIDEO