महाराष्ट्र

पालघरमधील धक्कादायक घटना; जंगलात आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह

पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंड जंगलात मंगळवारी (दि. ५) एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

नेहा जाधव - तांबे

पालघर जिल्ह्यातील वाघोबा खिंड जंगलात मंगळवारी (दि. ५) एका ३५ वर्षीय महिलेचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह अत्यंत कुजलेल्या अवस्थेत होता आणि प्राथमिक अंदाजानुसार महिलेचा मृत्यू ४ ते ५ दिवसांपूर्वी झाला असावा. ही घटना पालघर-मनोर रोडलगतच्या जंगलात उघडकीस आली. PTI ने या घटनेचे वृत्त दिले आहे.

आधार कार्डवरून पटली महिलेची ओळख

घटनास्थळी पोलिसांनी तपास करताना एक आधार कार्ड मिळाले. त्याच्या आधारे महिलेची ओळख पटली असून ती मनोरमधील रायस्पाडा गावाची रहिवासी होती, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

पालघर पोलिसांनी सदर प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. रिपोर्ट आल्यानंतरच पुढील दिशा निश्चित केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

उच्च न्यायालयाचा स्टेट बँकेला दणका; मूळ कागदपत्रे परत करणे बँकेचीच कायदेशीर जबाबदारी

मेट्रो-५ च्या चाचणीची तयारी अंतिम टप्प्यात; ठाणे-भिवंडी मेट्रो मार्गावर २५ हजार व्होल्टचा वीजप्रवाह सुरू

लाऊडस्पीकर लावा, पण नियमांचे पालन करा! समन्वय समितीचे गणेश मंडळांना आवाहन, बाप्पाच्या उंचीबाबत तज्ज्ञांची नियुक्ती करावी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत; जागतिक फिनटेक फेस्ट २०२६ चे करणार उद्घाटन

Mumbai : आरक्षित भूखंडावरील अतिक्रमणावर बुलडोझर; अंधेरीत गॅरेज आणि मंगल कार्यालय जमीनदोस्त