महाराष्ट्र

पंढरपूर येथे पूजेची ऑनलाईन नोंदणी होणार

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर येथील विठ्ठल व रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना दिल्या जातात. या पूजेसाठी भाविकांना ऑनलाईन सुविधा दिली आहे.

Swapnil S

पंढरपूर : महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूर येथील विठ्ठल व रखुमाई मंदिरात श्री विठ्ठल आणि रखुमाईच्या नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा, महानैवेद्य सहभाग योजना इत्यादी सर्व प्रकारच्या पूजा श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून भाविकांना दिल्या जातात. या पूजेसाठी भाविकांना ऑनलाईन सुविधा दिली आहे.

१ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीतील पूजेची ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्याची सुरुवात २८ जुलै रोजी सकाळी ११ पासून होत असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

मंदिर समितीच्या १५ जून रोजीच्या सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत निर्णय घेण्यात आला होता. यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. भाविकांना पूजेची नोंदणी https://www.vitthalruk minimandir.org या मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून करता येणार आहे. श्रींच्या नित्यपूजा, तुळशी अर्चन पूजा व पाद्यपूजा ऑनलाईन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून दिल्या होत्या. यात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून व देशभरातून कर्नाटक, आसाम, आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातील भाविकांनी पूजेची नोंदणी केली होती. याला भाविकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

आता चौथ्या टप्प्यात १ ऑगस्ट ते ३१ डिसेंबर या कालावधीतील सण, उत्सव व गर्दीचे दिवस वगळून इतर दिवशीच्या श्रींच्या नित्यपूजा व पाद्यपूजा तसेच १ ते ३१ ऑगस्ट कालावधीतील तुळशी अर्चन पूजा व महानैवेद्य सहभाग योजना ऑनलाइन नोंदणीसाठी भाविकांना उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ऑनलाईन नोंदणीसाठी काही अडचणी आल्यास मंदिर समितीच्या नित्योपचार कार्यालयातून नोंदणी करून देण्यास मदत व आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात येईल. याबाबतची अधिक माहिती, अटी व शर्ती मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. याशिवाय पूजेचे बुकिंग मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच करावे, असे आवाहन कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केले.

मालदीवसोबत संबंध अधिक मजबूत करण्यासाठी भारत तयार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

महायुतीत बेबनाव; संजय शिरसाट-माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली

हिंजवडी आयटी पार्कचे वाटोळे; आयटी उद्योग बंगळुरू, हैदराबादला चालले; उपमुख्यमंत्री अजित पवारांचा संताप

शाळांचे सुरक्षा ऑडिट करणे बंधनकारक; केंद्राचे सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांना सूचनावजा आदेश

अटल सेतूमुळे सरकार मालामाल! आतापर्यंत १ कोटी ३० लाख वाहनांचा प्रवास