पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण होणार? भाजप दिग्गजांमध्ये चुरस, 'हे' आहेत प्रबळ दावेदार  (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडचा महापौर कोण होणार? भाजप दिग्गजांमध्ये चुरस, 'हे' आहेत प्रबळ दावेदार

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचे खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली आहे. महापौर होण्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून पक्षाचे अनेक दिग्गज नगरसेवक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Swapnil S

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाचे खुल्या प्रवर्गासाठी (सर्वसाधारण) आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांची संख्या वाढली आहे. महापौर होण्यासाठी भाजपमध्ये मोठी चुरस निर्माण झाली असून पक्षाचे अनेक दिग्गज नगरसेवक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

महापौरपदाचे प्रबळ दावेदार

भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी लांडगे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीन लांडगे आणि सलग तिसऱ्यांदा भाजपकडून निवडून आलेले शीतल उर्फ विजय शिंदे हे महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

'या' नावांचीही चर्चा

आमदार शंकर जगताप यांचे निकटवर्तीय ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली जगताप, प्रभाग क्रमांक १९ मधील मंदार देशपांडे यांच्या नावांचीही जोरदार चर्चा आहे. याशिवाय विद्यमान उपमहापौर तुषार हिंगेंसह राहुल कलाटे, राजू मिसाळ आणि प्रशांत शितोळे हेही इच्छुक आहेत. याव्यतिरिक्त दुसऱ्या नगरसेवकाला संधी देऊन भाजपकडून धक्कातंत्र राबविले जाण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. महापालिकेत २०१७ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर पहिले अडीच वर्षे महापौरपद भोसरी मतदारसंघाकडे होते. आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नितीन काळजे आणि राहुल जाधव यांना सव्वा-सव्वा वर्षे महापौरपदाची संधी मिळाली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता कमीच आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत ८४ नगरसेवकांसह भाजपची सलग दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. त्यामुळे महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार निश्चित होणार आहे.

महापौरपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. विभागीय आयुक्तांना पत्र पाठवून महापौरांची निवडणूक घेण्याची मागणी केली जाणार आहे.
मुकेश कोळप, नगरसचिव, पिंपरी-चिंचवड महापालिका

ठाण्यात मंगळवारपासून १२ दिवस २०% पाणी कपात; न्युटिक गेट दुरुस्तीमुळे पाणीपुरवठा कमी, बघा पाणी शटडाऊन वेळापत्रक

महाराष्ट्र सदन घोटाळा : मंत्री छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता; ACBनंतर आता EDच्या प्रकरणातही दिलासा

Mumbai : सपा, राष्ट्रवादी गटाला समितीतही स्थान नाही; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एकच समिती; एमआयएमला लॉटरी

...तर पालिका आयुक्त, अधिकाऱ्यांचे पगार रोखू; हायकोर्टाची तंबी: प्रदूषण रोखण्यात BMC प्रशासन अपयशी!

भारत-न्यूझीलंड टी-२० मालिका : इशान, सूर्याचा झंझावात; न्यूझीलंडवर सहज मात; दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा ७ गडी राखून शानदार विजय