शरद पवार 
महाराष्ट्र

महाराष्ट्रामुळे संविधान बदलण्याचा डाव फसला; शरद पवार यांचे वक्तव्य

Maharashtra assembly elections 2024 : संविधान बदलण्यासाठी भाजपने ‘४०० पार’ची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा तुम्ही आम्हाला लोकसभेत निवडून दिल्या म्हणून मोदींचा संविधान बदलण्याचा डाव फासला, असे राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे सांगितले.

Swapnil S

जळगाव : संविधान बदलण्यासाठी भाजपने ‘४०० पार’ची घोषणा केली होती. मात्र, महाराष्ट्रात ४८ पैकी ३१ जागा तुम्ही आम्हाला लोकसभेत निवडून दिल्या म्हणून मोदींचा संविधान बदलण्याचा डाव फासला, असे राष्ट्रवादी (शप) काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी येथे सांगितले.

राज्यातील शेतकरी, महिला, युवावर्ग यांच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी राज्यात सत्ताबदल अपरिहार्य आहे, असे शरद पवार यांनी सांगितले.

जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे निवडणूक प्रचारसभेत पवार यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, वाढती बेरोजगारी यांचा उल्लेख केला आणि जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी सत्ताबदल गरजेचा असल्याचे सांगितले.

बदलापूरमध्ये शाळेतील चिमुरडीवर अत्याचार होतो, महिलांवर करण्यात आलेल्या अत्याचाराची आपण किती उदाहरणे देऊ, महिलांना सुरक्षा देण्याऐवजी महायुती आपल्या लाडक्या बहिणींना पैसे देत आहेत. लाडकी बहीण योजनेला आमचा विरोध नाही, तुम्ही त्यांना पैसे द्या, परंतु तुमच्या लाडक्या बहिणींची अवस्था काय आहे, एका माहितीनुसार नऊ हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत, असे शरद पवार म्हणाले.

राहणीमान सुधारण्यासाठी सत्ताबदल आवश्यक

केवळ शेतीवरच अवलंबून न राहता शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनी नियमित मिळकतीसाठी नोकऱ्याही कराव्या, सरकार बदलल्याविना तुमच्या राहणीमानात सुधारणा होणार नाही, त्यामुळे सत्ताबदल आवश्यक आहे आणि आमचे त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत, सरकार बदलण्यासाठी जे करणे गरजेचे आहे ते करण्याचे महाविकास आघाडीने ठरविले आहे, असेही ते म्हणाले.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी