महाराष्ट्र

कोल्हापुरातील आंदोलनादरम्यान पोलिसांचा लाठीचार्ज ; पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट

नवशक्ती Web Desk

कोल्हापुरात शिवराज्याभिषेक दिनी आक्षेपार्ह स्टेटस ठेवण्यात आल्यानंतर काल दुपारपासून कोल्हापुरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. या घटनेचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना एकत्र आल्या आहेत. त्यांनी आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू कार्यकर्ते जमले आहेत. पोलिसांनी संबंधितांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. मटण मार्केटमध्ये पोलिसांकडून सौम्य लाठीमार करण्यात आला. शिवाजी चौकात जमलेल्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी कोल्हापूर शहरात मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. मात्र कोल्हापूर पोलिसांनी त्यास विरोध करत तुम्हाला हवे तोपर्यंत या ठिकाणी आंदोलन करण्याचे आवाहन केले असून रॅली होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, हिंदुत्ववादी संघटनांनी विरोध करण्याची ठाम भूमिका घेतली आहे. कोल्हापूर पोलिसांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे. तसेच संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शिवाजी चौक परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार बंद आहेत.

दरम्यान, कोल्हापुरातील परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी सांगितले. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौक परिसर वगळता इतर ठिकाणी शांतता आहे. इतर तालुक्यांमध्ये दुकाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, बंदी आदेश असतानाही कोल्हापुरात सुरू असलेल्या आंदोलनाबाबत त्यांना विचारले असता, त्यांनी कालच आंदोलन करणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार ते आंदोलन करत आहेत. यावर आम्ही प्रतिक्रिया देत आहोत. विद्यार्थ्यांसह कोणालाही त्रास होऊ नये म्हणून पोलीस अधीक्षकांनी हिंदुत्ववादी संघटनांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. 

काय आहे नेमकं प्रकरण ?

काही तरुणांनी पोस्ट केलेल्या आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापूरच्या एकात्मतेला तडा गेला आहे. अशा समाजकंटकांवर पोलिसांनी कडक कारवाई करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस