महाराष्ट्र

मतदान बूथ खासगी गृहनिर्माण संस्थेत नकोच; राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा विरोध

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपुऱ्या बूथसंख्येमुळे मतदानाचा टक्का घसरल्याची बाब मतदान अधिकारी यांचे निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती.

Swapnil S

मुंबई : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अपुऱ्या बूथसंख्येमुळे मतदानाचा टक्का घसरल्याची बाब मतदान अधिकारी यांचे निदर्शनास यापूर्वीच आणून दिली होती. त्याबाबत शनिवारी घाटकोपर पश्चिम १६९ विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यांच्या समवेत झालेल्या बैठकीत विधानसभा निवडणुकींकरिता खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात मतदान बूथ उभारण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.

लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान विशिष्ट समाजाच्या उमेदवारांना काही खासगी इमारतींमध्ये प्रवेश नाकारण्यात आल्याची बाब लक्षात घेता, जर मतदार बूथ खासगी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीत उभारल्यास त्या इमारतीत राहणाऱ्या विशिष्ट समाजाचा प्रभाव सर्वसामान्य मतदारांवर पडू शकतो. त्याचप्रमाणे त्यातून निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून खासगी गृहनिर्माण संस्थांच्या आवारात मतदान बूथ उभारण्यास राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शरदचंद्र पवार पक्षाचे मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले विरोध आहे.

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत

अहिल्यानगरमध्ये तणाव; रास्ता रोको, लाठीमार

भारत-भूतान रेल्वेमार्गाने जोडणार; प्रकल्पाचा संयुक्त आराखडा जाहीर

पीडितांकडे न्यायालयाचे दुर्लक्ष नको; सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

राहुल गांधींच्या छातीत गोळी घालू; केरळ भाजप प्रवक्त्याचे धक्कादायक विधान