PTI (VIDEO SCREENGRAB)
महाराष्ट्र

पूजा खेडकर ‘यूपीएससी’विरोधात दिल्ली हायकोर्टात; अटक करण्यासाठी पोलिस घेतायेत शोध

वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस पद यूपीएससीने रद्द केल्याच्या विरोधात तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Swapnil S

पुणे : वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर हिचे आयएएस पद यूपीएससीने रद्द केल्याच्या विरोधात तिने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तिला नोटीस बजावणाऱ्यांना तिने पक्षकार केले आहे. या याचिकेत पूजा खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकारचे कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग, मसुरी येथील लालबहादूर शास्त्री प्रशासकीय अकादमी, पुणे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव यांना प्रतिवादी केले आहे.

उच्च न्यायालयाने नुकताच पूजा खेडकरचा अटकपूर्व जामीनअर्ज फेटाळून तिला मोठा धक्का दिला होता. सतत खोटे बोलून आणि प्रमाणपत्रांमध्ये फसवणूक करून तिने ‘यूपीएससी’ची परीक्षा दिल्याचा आरोप तिच्यावर आहे. याप्रकरणी तिच्याविरोधात पुरावेही आढळून आल्याने आता दिल्ली पोलीस तिला अटक करण्यासाठी तिचा शोध घेत आहेत. पण, ती अद्याप फरार आहे.

पूजा खेडकर ‘यूपीएससी’च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी आढळल्यानंतर ‘यूपीएससी’ने तिची निवड रद्द केली आहे. तसेच भविष्यात तिला कोणत्याही ‘यूपीएससी’ परीक्षेला बसण्यासही बंदी घातली आहे. पूजा खेडकरसह तिची आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याला बंदूक दाखवत धमकावल्याप्रकरणी तिची आई मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली होती. त्या सध्या जामिनावर बाहेर आहेत.

‘यूपीएससी’ने उच्च न्यायालयात सांगितले की, पूजा खेडकरने केवळ तिचे नावच नाही, तर तिच्या पालकांचे नावही बदलले आहे. याशिवाय, फोटो-स्वाक्षरी, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलून बनावट ओळख निर्माण केली. पूजा खेडकर हिने सात वेळा आपले नाव बदलल्याचे ‘यूपीएससी’ने सांगितले.

पूजा खेडकरचा शोध सुरू

नियमांनुसार परवानगी असलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळा परीक्षा देत फसवणूक केल्याचा आरोपही पूजावर आहे. दिल्ली पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच, ते पूजा खेडकरचा शोधही घेत आहेत.

अदानी पुन्हा गोत्यात; सौरऊर्जा कंत्राट मिळविण्यासाठी दिली 2000 कोटींची लाच, अमेरिकेतील कोर्टात आरोप

मुख्यमंत्रीपदावरून रणकंदन! महायुतीत फडणवीस, शिंदे, अजित पवारांच्या नावाचे दावे

अपक्ष, बंडखोरांवर सत्ता स्थापनेची मदार; महायुती व मविआची जोरदार मोर्चेबांधणी

रशियाचा युक्रेनवर आंतरखंडीय क्षेपणास्त्राने हल्ला

कोल्हापूरच्या चेतन पाटीलला जामीन मंजूर; जयदीप आपटेच्या जामिनावर सोमवारी सुनावणी