महाराष्ट्र

बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये प्रतिभा पवारांना अडविले

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा आणि नात रेवती यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या बारामती टेक्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना पार्कमध्ये सोडण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातूनच देण्यात आली आहे. या प्रकारामुळे आता वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे.

Swapnil S

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा आणि नात रेवती यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार अध्यक्ष असलेल्या बारामती टेक्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले आणि त्यानंतर अर्ध्या तासाने त्यांना पार्कमध्ये सोडण्यात आल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांच्या कार्यालयातूनच देण्यात आली आहे. या प्रकारामुळे आता वेगळीच राजकीय चर्चा रंगली आहे.

प्रतिभा पवार आणि रेवती सुळे यांना अडवल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. प्रतिभा पवार आपली नात रेवती सुळेंसह शॉपिंग करण्यासाठी बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये आल्या होत्या. त्यांची गाडी गेटवर आल्यानंतर अडवण्यात आली, त्याचबरोबर गेट पुढे केले, असा दावा व्हिडीओमध्ये केला जात आहे. तर गेटवर असलेल्या सुरक्षा रक्षकाला त्यांनी याबाबत प्रश्न विचारले असता, त्यांनी जास्त काही उत्तर दिली नसल्याचे दिसून आले. आम्हाला वरुन आदेश आलेत, फोन आला, त्यामुळे गेट लावले, असे गेटवर तैनात असलेला सुरक्षा रक्षकाने यावेळी सांगितल्याचे दिसून येत आहे.

या व्हिडिओमध्ये प्रतिभा पवार सुरक्षा रक्षकाला प्रश्न विचारत असल्याचे दिसत आहे. तुम्ही आम्हाला पाहून गेट बंद केले का, गेट बंद करण्यासाठी कोणी सांगितले, तुम्हाला कोणाचा फोन आला, आतमधील दुकाने बंद आहेत का, आम्हाला शॉपिंग करायची आहे, आम्हाला त्या बॅगच्या शॉपमध्ये जायचे आहे, असे प्रतिभा पवार बोलत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

अर्ध्या तासांनंतर सोडले आत

अनेक प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर जवळपास अर्ध्या तासांनी सुरक्षारक्षकाने त्यांना सोडले. जवळपास अर्धा तास त्यांना गेटवरच थांबवण्यात आले होते. मात्र, या अडवणुकीचे कारण समजू शकलेले नाही. बारामतीमध्ये याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत. नक्की त्यांना अडवण्याचे काय कारण असावे, याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम