साताऱ्यामध्ये मॉन्सूनपूर्व पावसाची हजेरी FPJ
महाराष्ट्र

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान 

सातारा जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच कराड शहरासह परिसराला शनिवारी दुपारी तर सातारा शहरासह परिसराला शुक्रवार व शनिवारी सलग दोन दिवस मान्सूनपूर्व (वळीव) पावसाने चांगलेच झोडपून काढले.

Suraj Sakunde

रामभाऊ जगताप, कराड :                                                    

सातारा जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढला असतानाच कराड शहरासह परिसराला शनिवारी दुपारी तर सातारा शहरासह परिसराला शुक्रवार व शनिवारी सलग दोन दिवस मान्सूनपूर्व (वळीव) पावसाने चांगलेच झोडपून काढले.शनिवारी दुपारच्या वेळी ढगांच्या गडगडाटात जोरदार पावसाने हजेरी लावली.यावेळी वादळी वारेही वाहत होते.दरम्यान,कराड शहरासह परिसरात वादळी वाऱ्यामुळे शहर व परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता.मात्र पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होत तापमापीतील पारा घसरला असल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे.         

सातारा शहरासह पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात पाऊस-                       

शुक्रवारी सातारा शहरासह पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसरात पाऊस झाला.तसेच पाटण तालुक्यातही पावसाने हजेरी लावली.मात्र,यावेळी जोरदार वादळी वाऱ्यामुळे पाटण तालुक्यातीळ ढेबेवाडी खोऱ्यातील अनेक शाळा,घरावरील पत्रे उडून गेल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले.यातून आज शनिवारी लोक सावरत असतानाच कराडसह जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला.कराड परिसरात दुपारी ४ वाच्या सुमारास तर सातारा शहरात दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हलक्या सरी पडल्या तर काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटात पाऊस झाला.विशेषता शहराच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस पडला. यावेळी जोरदार वारे वाहत असल्याने झाडे झुडपे हलकावे खात होती.त्यातच वीजपुरवठा खंडित झाला होता.मात्र कराड,सातारा शहरात अवघा दहा मिनिटे पाऊस झाला तरी वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेलं-

सातारा जिल्ह्यात मे महिना सुरू झाल्यापासून तापमानाचा पारा वाढला होता.दिवसभर रखरखीत ऊन पडत होते. कराडसह सातारा शहरात तर बहुतांशी वेळा तापमान हे ४० अंशावर राहिले. त्यामुळे उष्णतेची लाट आल्याचे चित्र होते. परिणामी नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत होता.असे असतानाच दोन दिवसापासून वातावरणात बदल झाला आहे.जिल्ह्यात ढगाळ वातावरण तयार होत असून अनेक ठिकाणी वळवाचा पाऊस हजेरी लावू लागला आहे.यामध्ये शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाटण तालुक्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह वळीव पावसाने हजेरी लावली.पण,या वादळामुळे अनेक ठिकाणी नुकसान झाले.यामध्ये  काळगाव परिसरात घरावरील छप्पर उडून गेले.यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्य,धान्य भिजले तर एका साबळेवाडी येथे कारवर झाड पडल्यामुळे वाहनाचे नुकसान झाले आहे.जवळपास एक तासभर वादळी पाऊस सुरू होता.वादळामुळे पाटण तालुक्यातील मालदन, तळमावले, गलमेवाडी, मानेगाव येथे मोठे नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतूक बंद झाली होती. वीजवाहिन्यावरही झाडे पडली असल्याने अनेक भागांतील वीजपुरवठा अद्यापही खंडित झाला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी