महाराष्ट्र

सैराटमधील प्रिन्स गजाआड जाण्याची शक्यता

महेश वाघडकर या नेवासा तालुक्यातील तरुणाला दोघांनी मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते

वृत्तसंस्था

सैराट सिनेमातील अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारा प्रिन्स अर्थात सूरज पवार याच्यावर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. नोकरीच्या आमिषाने लुबाडणारे एखादे रॅकेट उघडकीस आले असून, त्यात सूरज पवारचा सहभाग आढळून आला आहे. याप्रकरणी त्याच्यावर केव्हाही अटकेची कारवाई होऊ शकते. महेश वाघडकर या नेवासा तालुक्यातील तरुणाला दोघांनी मंत्रालयात नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. यासाठी त्याच्याकडे पाच लाखांची मागणी करण्यात आली होती. नोकरी लागल्यावर तीन लाख तर सुरुवातीला दोन लाख देण्याबाबतची बोलणी झाली होती; मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महेश यांनी राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अधिक चौकशी केली असता त्याच्यासोबत आणखी काही जण या घटनेत सहभागी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत दत्तात्रेय क्षीरसागर, आकाश शिंदे आणि ओंकार तरटे या तिघांना अटक केली आहे. सूरज पवार यालाही अटक केली जाणार आहे. बनावट सही- शिक्के वापरून त्यांनी दस्तावेज तयार केल्याचेही निदर्शनास आले आहे.

मुख्यमंत्रीपदाचा फैसला आज; महायुतीचे नेते व केंद्रीय संसदीय मंडळ घेणार निर्णय

महायुतीत मंत्रिपदासाठी २१-१२-१० चा फॉर्म्युला

आजपासून सुरू होणारे संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; अदानी, मणिपूरवर चर्चा करा! सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांची मागणी

यशस्वी, विराटचा शतकी तडाखा; भारताचा दुसरा डाव ४८७ धावांवर घोषित; ऑस्ट्रेलियाची ३ बाद १२ अशी अवस्था

यूपीतील हिंसाचारात तिघांचा मृत्यू; २० पोलिसांसह अनेक जण जखमी