ANI
ANI
महाराष्ट्र

शिंदे गटाच्या अडचणी वाढल्या ? ठाण्यात श्रीकांत शिंदेंचं शक्तिप्रदर्शन

प्रतिनिधी

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उघडपणे आता दोन गटात विभागले गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये खळबळ उडाली असून बंडखोर आमदारांची कार्यालयेही फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांचा आक्रमकपणा पाहता राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून काही ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदेही मागे हटायला तयार नसून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शिवसेनेचा नवा गट स्थापन केल्याचे बोलले जात आहे. या सर्व गोष्टी होत असतानाच विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनी १६ बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आहे. नोटिसला उत्तर न दिल्यास या आमदारांवर कारवाई होऊ शकते. अशा स्थितीत आता शिंदे गटाचे बंडखोर आमदार काय भूमिका घेतात हे पाहावे महत्वाचे ठरणार आहे.

श्रीकांत शिंदे यांचं शक्तिप्रदर्शन

दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे यांच्या समर्थनार्थ शनिवारी सायंकाळी शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातील लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर मोठ्या संख्येने शिंदे समर्थक निदर्शने करत आहेत. एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी बंडखोर आमदारांच्या समर्थनार्थ बोलले. यावेळी माजी नगराध्यक्ष नरेश म्हस्के यांनीही जमलेल्या लोकांना संबोधित केले.

काय म्हणाले श्रीकांत शिंदे ?

“गेल्या तीन-चार दिवसांपासून परिस्थिती कशी चालली आहे ते तुम्ही पाहत आहात. आज तुम्ही मोठ्या संख्येने एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहात. आजही एकनाथ शिंदे शिवसैनिक असल्याचे सांगत आहेत. आज महाराष्ट्रात मोठा विकास झाला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेकडे आज 40 आणि 10 अपक्ष आमदार आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास दाखवण्याची ही इतिहासात पहिलीच वेळ असेल असे मला वाटते. यामागे एक कारण आहे. माझ्या मनात जे होते ते फुटले. इथे इतके लोक का उपस्थित आहेत हे संशयास्पद आहे,” श्रीकांत शिंदे म्हणाले. याव्यतिरिक्त देखील अनेक मुद्दे त्यांनी आपल्या भाषणात मांडले.

"तर पवारांची औलाद सांगायचो नाही..." उदयनराजेंच्या प्रचारसभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले?

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

"अपना टाईम भी आयेगा" म्हणत बिचुकलेंनी सांगितले कल्याण मतदारसंघ निवडण्याचे कारण

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

दोन्ही हात नसतानाही मिळवलं ड्रायव्हिंग लायसन्स, तमिळनाडूच्या तरूणानं कशी साधली किमया?