महाराष्ट्र

अकोल्यातील घटनेनं खळबळ, २५ वर्षीय तरुण चक्क तिरडीवरच उठून बसला

अकोला जिल्ह्यातील विवरा गावातील प्रशांत मेसरे या 25 वर्षीय तरूणाचा संध्याकाळी मृत्यू झाल्याचे कळाले मात्र, अंत्यसंस्कारासाठी नेत असतानाच तो चक्क उठून बसल्याची घटना घडली.

प्रतिनिधी

अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातल्या विवरा गावातील प्रशांत मेसरे या २५ वर्षीय तरुणाचा काल संध्याकाळी मृत्यू झाला होता. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर मोठं दुःख कोसळतं, हा क्षण अत्यंत भावुक करणारा असतो. या घडलेल्या घटनेची गावात चांगलीच चर्चा रंगली. काही लोक याला दैवी चमत्कार समजत आहेत, तर काही वैद्यकीय चूक समजत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत मेसरे हा तरूण मागच्या काही दिवसांपासून आजारी होता. तो युवक अकोला पोलिस दलातील चान्नी पोलिसांत कार्यरत आहे. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली इथे त्याच्यावर उपचार सुरु होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असं समजलं त्यानंतर नातेवाईकांनी त्याला अंत्यविधीसाठी अकोला जिल्ह्यातील विवरा गावात आणले. गावकऱ्यांसह नातेवाईक त्याला घेवून अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीकडे निघाले. असताना हा तरूण तिरडीवरच उठून बसल्याचे समजले आणि ते पाहून सर्व थक्क झाले. या घटनेमागे नेमकं काय प्रकरण आहे ? कोणाचा दोष आहे ? याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश