महाराष्ट्र

Pune : प्रवाशाच्या बॅगेतून मॅग्झिनसह २८ जिवंत काडतुसे जप्त

लोहगाव येथील पुणे विमानतळावरून पुणे-हैद्राबाद अशा विमानाने प्रवास करण्यासाठी जात असलेल्या इंदापूर येथील एका प्रवाशाच्या बॅगेतून ७.६५ कॅलीबरच्या दोन मॅग्झिनसह २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Swapnil S

पुणे : लोहगाव येथील पुणे विमानतळावरून पुणे-हैद्राबाद अशा विमानाने प्रवास करण्यासाठी जात असलेल्या इंदापूर येथील एका प्रवाशाच्या बॅगेतून ७.६५ कॅलीबरच्या दोन मॅग्झिनसह २८ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

दीपक काटे (३२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. शिवधर्म फाऊंडेशन या संघटनेचा संस्थापकही आहे. सोशल मीडियावर त्यांचे अनेक भाजप नेत्यांसोबत सार्वजनिक कार्यक्रमांमधील फोटो दिसून येत असल्याने त्याच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

याबाबत इंडिगो एअरलाईन्सच्या सुरक्षा अधिकारी प्रीती लक्ष्मण भोसले यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. भोसले या विमानतळावर प्रवाशांचे बॅगेज स्क्रिनिंगचे व तपासणीचे काम करत होत्या.

त्या वेळी काटे हा पुणे विमानतळ येथे आला असता मशीनमध्ये त्याच्या बॅगची तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्याच्या बॅगेत मेटल डिटेक्ट झाल्याने त्याच्या बॅगेत एका कॅरिबॅगमध्ये ७.६५ कॅलीबरचे दोन मॅग्झिन व २८ काडतुसे मिळून आली. त्याच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्याने याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ केली. तो विमानाने हैद्राबाद येथे जात असताना ही कारवाई करण्यात आली.

Mumbai : मुंबई पोलिसांची फटाक्यांवर कडक नियमावली; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती