महाराष्ट्र

Raj Thackeray : पुण्यात रिक्षाचालक पदाधिकारी निवेदन घेऊन आले आणि राज ठाकरे म्हणाले, 'आम्ही फक्त...'

पुण्यात सुरु असलेल्या रिक्षाचालकांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली.

प्रतिनिधी

गेले २ दिवस पुण्यामध्ये रिक्षाचालकांची आंदोलन सुरु आहे. अशामध्ये रिक्षा चालक संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी पुण्यात आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी पुण्यात चालणाऱ्या बेकायदा बाईक टॅक्सी सेवा पुर्णपणे बंद करण्यासाठी राज ठाकरेंकडे निवेदन दिले. 'आपली मागणी संबधितांपर्यंत पोहचवू' असे राज ठाकरे यांनी यावेळी त्यांना सांगितले. मात्र, तिथून उठत असताना त्यांनी 'आम्ही फक्त प्रश्न सोडवयालाच असतो,' असे म्हंटले आणि उपस्थितामध्ये एकच हशा पिकला. त्यावरून राज ठाकरे यांनी मते मिळत नसल्याची खंत तर बोलून दाखवत नाहीत ना? असा प्रश्न काहींना पडला.

बेकायदा बाइक-टॅक्सी विरोधात २८ नोव्हेंबरपासून पुण्यातील रिक्षा चालक संघटनांनी बेमुदत आंदोलन सुरु केले आहे. शहरातील बेकायदा बाइक टॅक्सी सेवा बंद करण्यात यावी या मागणीसाठी पुणे शहरातील हजारो रिक्षाचालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आज पुण्यामध्ये आलेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यावर, या संदर्भातील व्यक्तीशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. आज संध्याकाळपर्यंत कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याशी नक्की बोलणं होईल, असा विश्वास दिला. यापूर्वीही राज ठाकरे यांनी अनेकवेळा मते मिळत नसळायची खंत बोलून दाखवली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक