महाराष्ट्र

Pathaan : 'पठाण' विरोधात बजरंग दल पुन्हा आक्रमक; पुण्यात उतरवले पोस्टर्स

एकीकडे देशभरात 'पठाण'ला (Pathaan) जोरदार विरोधात होत असताना आता याचे पडसाद महाराष्ट्रातही दिसून येत आहेत

प्रतिनिधी

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा बहुचर्चित 'पठाण' (Pathaan) हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला देशभरात प्रदर्शित होत आहे. प्रदर्शनासाठी दोनच दिवस राहिले असताना चित्रापटावर सुरु झालेला वाद काही थांबायचे नाव घेत नाही आहे. 'बेशरम रंग' या गाण्यामध्ये अभिनेत्री दीपिका पदुकोणने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकनीवर या वादाला सुरुवात झाली. यावरून देशभरात या चित्रपटाविरोधात निदर्शने झाली. आता पुण्यामध्येही याचे पडसाद दिसत असून बजरंग दलने या चित्रपटाचे मोठे पोस्टर खाली उतरवत आपला निषेध व्यक्त केला.

पुण्यामध्ये राहुल टॉकीजच्या बाहेर शाहरुखच्या ‘पठाण’चे मोठे पोस्टर लावण्यात आले होते. याची माहिती बजरंग दलला मिळताच आक्रमक झाले. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी या टॉकीज बाहेर लावण्यात आलेले हे मोठे पोस्टर खाली उतरवले. हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असा इशारादेखील त्यांनी घेतला. या घटनेचा संपूर्ण व्हिडीओ व्हायरल होत आहे. याआधी आसाममध्येही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाहरुख खानचे चित्रपटाचे पोस्टर फाडत आपला निषेध नोंदवला होता.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात परीक्षेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद