Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह  प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : सुट्टीसाठी आजीकडे आलेल्या ४ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार; हत्या करुन शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे ४ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीने मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्यात...

Mayuri Gawade

पुण्यात भोर तालुक्यातील नसरापूर गावात ४ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी गावातीलच ६५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी सुट्टीसाठी आजीच्या घरी आली होती. घटनेच्या दिवशी आरोपीने तिला खाऊचे आमिष दाखवत घराजवळील गोठ्यात नेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तेथे तिच्यावर अत्याचार केल्यानंतर ओळख पटू नये म्हणून दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचा आरोप आहे.

शेणाच्या ढिगाऱ्यात लपवला मृतदेह

पीटीआयच्या वृत्तानुसार, गुन्हा लपवण्यासाठी आरोपीने मुलीचा मृतदेह गोठ्यातील शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवण्याचा प्रयत्न केला. दुपारच्या सुमारास मुलगी बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. शोधमोहीमेदरम्यान तिचा मृतदेह आढळून आला.

सीसीटीव्हीमुळे आरोपीपर्यंत पोहोचले पोलीस

परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मुलीला सोबत घेऊन जाताना दिसल्याची माहिती समोर आली आहे. या आधारे पोलिसांनी संशयिताची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतले.

गावकऱ्यांचा संताप, निषेध आंदोलन

या घटनेनंतर नसरापूर परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. मुलीचा मृतदेह पोलिस ठाण्याजवळ आणल्यानंतर भावनिक वातावरण निर्माण झाले. कुटुंबीयांनी आक्रोश व्यक्त केला, तर गावकरी मोठ्या संख्येने जमा होत आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करू लागले.

नागरिकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करत निषेध आंदोलन केले. काही काळ रस्ता रोको आंदोलनही करण्यात आले.

१५ दिवसांत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, या प्रकरणात १५ दिवसांच्या आत आरोपपत्र दाखल करण्यात येईल. तसेच हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाईल. आरोपीविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

नसरापूर बंद, निषेध मोर्चा

शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ नसरापूर गावात बंद पाळण्यात आला. व्यापारी संघटना आणि स्थानिक नागरिकांनी दुकाने बंद ठेवून पीडित कुटुंबाला पाठिंबा दर्शवला.

भैरवनाथ मंदिरापासून सकाळी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले. शेकडो नागरिकांनी या मोर्चात सहभागी होत पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video