Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा आईकडून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या लग्नासाठी मुलगा अडथळा ठरत असल्याने हा गुन्हा केल्याची आरोपीची कबुली असून पोलिसांनी तिला अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली
Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
Published on

ज्या आईवर मुलाचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं, त्याच आईने स्वतःच्या लेकराचा जीव घेतल्याची संतापजनक घटना पुण्यात समोर आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकून प्रकरण लपवण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी २२ वर्षीय महिलेला अटक केली आहे. ही घटना ८ मार्च रोजी घडली असून सोमवारी (दि. ५) संबंधित महिलेला अटक करण्यात आली.

दरम्यान, काही माध्यमांच्या वृत्तानुसार, मृत बालकाचे नाव यश रवींद्र पवार असून आरोपी आईचे नाव पूजा रवींद्र पवार (वय २२) असे असल्याचे सांगण्यात येत आहे.

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली
Chandrapur : मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून प्रेयसीची हत्या अन् केला आत्महत्येचा बनाव; आरोपी प्रियकर अटकेत

घटना उघड कशी झाली?

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने मागील महिन्यात पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती की, पत्नी अकरा महिन्यांच्या मुलासह घरातून निघून गेली आहे. त्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आणि ५ एप्रिल रोजी जांबूत गावात त्या महिलेला शोधून काढण्यात आलं.

सुरुवातीला चौकशीदरम्यान महिलेने मुलगा पायरीवरून पडून मृत्यू झाल्याचा दावा केला. भीतीपोटी मृतदेह पिशवीत भरून शेतातील विहिरीत टाकल्याचं तिने सांगितलं. तिच्या या जबाबाच्या आधारे सुरुवातीला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, तिच्या जबाबातील विसंगतींमुळे पोलिसांचा संशय बळावला.

दुसऱ्या लग्नात मुलगा आड येत असल्याने काटा काढला...

पुढील चौकशीत पोलिसांनी अधिक कसून तपास केला असता महिलेने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी महिला मुलाच्या सतत रडण्यामुळे त्रस्त होती. तसेच तिला सध्याच्या पतीला सोडून दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करायचं होतं. मुलगा आड येत असल्याने त्याचा काटा काढण्याचा निर्णय घेतल्याचं तिने पोलिसांना सांगितलं.

याच रागातून तिने मुलाचं डोकं धुण्याच्या दगडावर आपटून त्याचा खून केला. त्यानंतर मृतदेह पिशवीत भरून शेतातील विहिरीत टाकला.

Pune : दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत होता… आईनेच घेतला ११ महिन्यांच्या चिमुकल्याचा जीव; स्वतःच दिली कबुली
Mumbai : धावत्या लोकलसमोर बायकोला ढकलून दिले; मुलुंड स्थानकावर धक्कादायक प्रकार, आरोपी नवरा अटकेत

मृतदेह विहिरीतून बाहेर; तपास सुरू

पोलिसांनी विहिरीतून कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर बालकावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी आरोपी महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in