महाराष्ट्र

मद्यधुंद तरुणाने पुण्यात पीएमपीएलची बस चालवली; VIDEO

पुणे शहरात शनिवारी एका मद्यधुंद तरुणाने चक्क पीएमपीएलची बस पळवून ती बेदरकारपणे चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे वेळेत बस थांबवण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली.

Swapnil S

पुणे : पुणे शहरात शनिवारी एका मद्यधुंद तरुणाने चक्क पीएमपीएलची बस पळवून ती बेदरकारपणे चालवल्याचा प्रकार समोर आला आहे. सुदैवाने, पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि धाडसामुळे वेळेत बस थांबवण्यात यश आले, ज्यामुळे एक मोठी दुर्घटना आणि जीवितहानी टळली. या घटनेने पुणेकरांना २०१२ मधील भीषण 'संतोष माने' प्रकरणाची आठवण करून दिली, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, ही बस नतावाडी आगाराची होती. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर आंदोलन सुरू होते, त्या परिसरात उभी असलेली ही बस या मद्यधुंद तरुणाने ताब्यात घेतली. सुदैवाने ज्या वेळी हा प्रकार घडला, त्या वेळी बसमध्ये एकही प्रवासी नव्हता. या तरुणाने बस चोरून नेण्याच्या उद्देशाने ती चुकीच्या दिशेने आणि अत्यंत बेशिस्तपणे चालवण्यास सुरुवात केली. अत्यंत रहदारीच्या या परिसरातून तो बस पळवत असताना त्याने डेक्कनच्या गुड लक चौकात बस थेट दुभाजकावर चढवली आणि पुन्हा तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून व्हिडीओत ही बस धोकादायक पद्धतीने रस्त्यावरून जाताना दिसली. पोलिसांनी प्रसंगावधान राखून बसचा पाठलाग सुरू केला. मद्यधुंद तरुणाला डेक्कन कॉर्नरच्या वळणावर मोठी बस नीट वळवता आली नाही, ज्यामुळे बसचा वेग मंदावला. याच संधीचा फायदा घेत पोलीस कर्मचारी धावत बसपर्यंत पोहोचले आणि त्यांनी बस थांबवली. अखेर पोलिसांनी बसमध्ये शिरून बळाचा वापर करत त्याला खाली उतरवले आणि ताब्यात घेतले.

पकडलेल्या तरुणाने आपली ओळख लपवण्यासाठी तोंडाला रुमाल बांधला होता. पोलिसांनी त्याचा रुमाल काढला तेव्हा तो तरुण प्रचंड मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आणि साधे बोलण्याच्याही स्थितीत नसल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस स्टेशनला नेले. हा तरुण कोण आहे, तो कुठून आला होता आणि बस पळवण्यामागे त्याचा नेमका हेतू काय होता, याचा सविस्तर तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.

Pune : प्रियकरासोबत मिळून होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढला? दरीत ढकलून अपघाताचा बनाव; तपासात समोर आले धक्कादायक खुलासे

केंद्राच्या तात्पुरत्या बंदीनंतर प्ले स्टोअरवर Telegram पुन्हा सुरू; पण ॲप स्टोअरवरून अजूनही गायब

Delhi Crime : फुटपाथवर झोपलेल्या ११ वर्षीय मुलीचे अपहरण; लैंगिक अत्याचारानंतर हत्या, कॅब चालक जेरबंद!

Mumbai : ‘ओसी’ नसलेल्या इमारतींना दिलासा; ८०० चौरस फुटांपर्यंत सदनिका असलेल्या इमारतींना मिळणार OC, राज्य सरकारची मंजुरी

Lucknow Fire : लग्नाचं स्वप्न झालं भस्मसात! जिथे प्रेम फुललं, तिथेच जोडप्याचा अंत, लखनऊ अग्निकांडमधील मन सुन्न करणारी घटना