Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

Pune : ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून तरुणीचा छळ; भोंदू बाबासह सहा जणांना अटक

स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Swapnil S

पुणे : स्वतःला ईश्वराचा अवतार असल्याचे भासवून एका ५९ वर्षीय भोंदू बाबाने उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राधामोहन मिश्रा असे या मुख्य आरोपीचे नाव असून, त्याने तरुणीला ओलीस ठेवून तिचे अमानुष शोषण केले. याप्रकरणी खराडी पोलिसांनी राधामोहन मिश्रासह त्याचा साथीदार स्वामी कंवल नयन आणि अन्य सहा महिलांना अटक केली आहे. पीडित तरुणी पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करत असून, आरोपींनी २००१ ते २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हरियाणा आणि पुणे परिसरात हा गुन्हा केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

स्वामी कंवल नयनच्या माध्यमातून पीडितेच्या कुटुंबाची ओळख पंचकुला येथील गुरुदेव साधना धाम ट्रस्ट चालवणाऱ्या राधामोहन मिश्राशी झाली होती. मिश्रा हा साक्षात ईश्वराचा अवतार असल्याचा बनाव रचून त्याने भाविकांची दिशाभूल केली. याच श्रद्धेचा गैरफायदा घेऊन आरोपींनी तरुणीला पतीपासून वेगळे केले आणि तिची सर्व मालमत्ता स्वतःच्या नावावर करून घेतली. तिला कुटुंबापासून वेगळे पाडून अमानुष शारीरिक व मानसिक छळ केल्याची माहिती समोर आली आहे. छळाला कंटाळलेल्या तरुणीने धाडस दाखवून पोलिसांकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.अप्पर पोलीस आयुक्त तेजस्विनी सातपुते यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाघोली जवळील उबाळेनगर येथील आश्रमावर छापा टाकून पोलिसांनी झडती घेतली.

आजचे राशिभविष्य, १३ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

IND vs NZ 4th ODI : मालिका विजयाची आज संधी; श्रेयसच्या नेतृत्वात भारताचा न्यूझीलंडविरुद्ध चौथा एकदिवसीय सामना

Cooking Tips : भाजी चविष्ट बनवण्याचे गुपित; मीठ-मसाला घालण्याची योग्य वेळ जाणून घ्या

Winter Skin Care : हिवाळ्यात त्वचेचा कोरडेपणा वाढलाय? ग्लिसरीन आणि लवंगापासून घरच्या घरी तयार करा 'हे' सिरम

अमेरिकेतही शिवाली परबचा देसी स्वॅग! पिवळ्या पंजाबी ड्रेसमधील गोड फोटो पाहून चाहते फिदा