कात्रजमध्ये छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या 
महाराष्ट्र

Pune : कात्रजमध्ये छळाला कंटाळून महिलेची आत्महत्या

पुणे शहरातील कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : पुणे शहरातील कात्रज परिसरात छळाला कंटाळून एका विवाहित महिलेने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाणे येथे सासरे आणि दिराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिलेच्या बहिणीने याबाबत पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सासरे हनुमंत काळे आणि दीर रतन यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला काही काळापासून कौटुंबिक छळाला सामोरी जात होती. लाकूड फोडण्याच्या कारणावरून आरोपींकडून तिला शिवीगाळ व मानसिक त्रास दिला जात होता. ११ एप्रिल रोजी रात्री सुमारे साडेआठच्या सुमारास महिलेने अंगावर पेट्रोल ओतून घेतले आणि स्वतःला पेटवून घेतले.

गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर तिच्या बहिणीने पोलिसांत तक्रार दाखल केली असून, छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मोहिते करत आहेत.

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही - मुंबई उच्च न्यायालय

Mumbai : पिसे पांजरपोळ जलबोगद्याला मंजुरी; पाणीगळती, पाणी चोरीच्या घटनांना लगाम

उल्हासनगरात डेंग्यूचा पहिला बळी; १७ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू