महाराष्ट्र

Pune : 'लिव्ह इन'मध्ये राहणाऱ्या महिलेला प्रियकराने संपवले; तिच्याच आईच्या घरासमोर रिक्षात मृतदेह ठेवून फरार

प्रेयसीचा मृतदेह रिक्षामध्ये ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी करून प्रियकर फरार झाला.

Swapnil S

पिंपरी (पुणे) : गणेशोत्सवाच्या धामधुमीत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन दिवसात खुनाची दुसरी घटना घडली. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केला. त्यानंतर प्रेयसीचा मृतदेह रिक्षामध्ये ठेवून रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर उभी करून प्रियकर फरार झाला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी सकाळी काळेवाडी स्मशानभूमीजवळ उघडकीस आला.

शिवानी सोमनाथ सुपेकर (२७) असे खून झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. प्रियकर विनायक आवळे हा पसार आहे. शिवानी हिच्या पतीचे २०१८ मध्ये निधन झाले आहे. शिवानीची आई काळेवाडी स्मशानभूमीजवळ राहते तर, संशयित आरोपी आवळे हा विवाहित असून तो पिंपरीत राहत आहे. त्याला २० वर्षाचा एक मुलगा आणि मुलगी आहे. मात्र त्याची पत्नी सोबत राहत नाही. तो रिक्षा चालवतो. गेल्या दोन वर्षांपासून विनायक आणि शिवानी हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते.

मंगळवारी त्यांच्यामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. त्या वादातून विनायक याने मध्यरात्री बारा ते पहाटे तीन या दरम्यान शिवानीचा गळा आवळून खून केला. शिवानीचा मृतदेह रिक्षात ठेवून त्यावर चादर टाकली. त्यानंतर रिक्षा तिच्या आईच्या घरासमोर पार्क केली. बुधवारी सकाळी आठच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र कुराडे, वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हाटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिक्षा क्रमांकावरून मालकाचा शोध घेतला. मात्र मालकाने ती रिक्षा आवळे याला भाड्याने दिल्याचे समोर आले.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

२६ देश युक्रेनला सुरक्षा हमी देणार