एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून... संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

एबी फॉर्म गिळला की फाडला? पुण्यातील शिंदेसेनेच्या उमेदवाराने स्वतः केला खुलासा, म्हणाले - "भावनेच्या भरात माझ्याकडून...

पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी, बुधवारी (दि.३१) मोठा राजकीय तमाशा बघायला मिळाला. शिंदेसेनेच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. आज (दि.१) एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले शिंदेसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांनी माध्यमांसमोर घडलेल्या प्रकाराची माहिती...

Krantee V. Kale

पुणे महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज छाननीच्या दिवशी, बुधवारी मोठा राजकीय तमाशा बघायला मिळाला. शिंदेसेनेच्या एका उमेदवाराने आपल्याच पक्षातील प्रतिस्पर्ध्याचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात एकच गोंधळ उडाला होता. आज (दि.१) एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेले शिंदेसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे यांनी माध्यमांसमोर घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आहे.

नेमकं काय झालं? आरोप काय?

पुण्यात भाजप-शिवसेना (शिंदेगट) यांच्यात युती होणार की नाही याबाबत अखेरपर्यंत संभ्रमाचं वातावरण होतं. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ३० डिसेंबरपर्यंत मुदत होती. पण, अखेरच्या क्षणी युती फिस्कटल्याचं स्पष्ट झाल्यावर दोन्ही पक्षांनी इच्छुक उमेदवारांना एबी फॉर्म वाटण्यास सुरूवात केली. यावेळी पद्मावती भागातील प्रभाग क्रमांक ३६ मधून शिंदेसेनेकडून मच्छिंद्र ढवळे यांना एबी फॉर्म देण्यात आला. त्यानंतर त्याच जागी उद्धव कांबळे यांनाही एबी फॉर्म देण्यात आला. आधी ढवळे, मग कांबळे अशा दोघांनीही शिंदेसेनेकडून मंगळवारी अर्ज दाखल केला. मात्र अर्ज छाननीच्या दिवशी, बुधवारी कांबळे कात्रजच्या क्षेत्रिय कार्यालयात पोहोचले आणि प्रभागातील सर्व उमेदवारांचे अर्ज पाहण्यासाठी मागितले. त्यात ढवळेंच्या निवडणूक अर्जासोबत जोडलेला पक्षाचा ए बी फॉर्म दिसताच तो फाडला, तोंडात टाकला आणि बाथरूमच्या दिशेने पळाले, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. ढवळेंचा फॉर्म आपल्या आधी भरला असल्यामुळे तो वैध ठरु शकतो या शक्यतेतून कांबळेंनी ढवळेंचा एबी फॉर्मच गिळून टाकल्याचंही सांगितलं जात आहे. 

"भावनेच्या भरात माझ्याकडून...

दरम्यान, या प्रकारानंतर पोलिसांनी कांबळेंना नोटीस जारी करून चौकशीसाठी बोलावले होते. आज सकाळी कांबळे पोलिसांत हजर झाले, आणि नंतर माध्यमांसमोरही आपली बाजू मांडली. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी एबी फॉर्म गिळल्याचा आरोप स्पष्टपणे नाकारला. "मी एबी फॉर्म गिळला किंवा खाल्ला नाही, तर फाडला" असे त्यांनी सांगितले. "माध्यमांमध्ये मी एबी फॉर्म गिळल्याच्या वगैरे ज्या बातम्या आल्या त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत. मी फॉर्म खाल्ला नाही. मी अर्ज भरल्यानंतर मच्छिंद्र ढवळे यांनीही आमच्या पक्षाकडून अर्ज भरल्याचे मला समजले. मी ढवळेंना ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी काही संबंधही नाही, त्यांनी कुठूनतरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमीट केला. म्हणून मी वरिष्ठांशी संपर्क साधून विचारणा केली असता मीच अधिकृत उमेदवार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. हा प्रकार समजल्यानंतर मी कार्यालयात पोहोचलो, त्यावेळी भावनेच्या भरात माझ्याकडून तो फाटला गेला. माझी चूक झाली आहे, मी ते १०० टक्के मान्य करतो", असंही त्यांनी सांगितलं.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

सिडकोच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार; २० वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय, नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

Thane : प्रक्रिया केलेले पाणी महापालिका विकणार; पाणीटंचाईसह अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटासाठी पालिका सज्ज