महाराष्ट्र

पुण्यात आठ हजार पोलीस तैनात; ड्रोन आणि CCTV ची नजर

अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बंदोबस्ताचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

Swapnil S

पुणे : अनंत चतुर्दशीच्या विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शुक्रवारी पोलीस आयुक्तालयात झालेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत बंदोबस्ताचा आढावा घेतला आणि आवश्यक त्या सूचना दिल्या.

वैभवशाली परंपरेनुसार विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभशनिवारी (६ सप्टेंबर) सकाळी साडेनऊ वाजता मंडईतील टिळक पुतळा परिसरातून होणार आहे. यंदा मानाच्या मंडळांसाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

मिरवणुकीदरम्यान ड्रोन कॅमेरे, सीसीटीव्ही आणि निरीक्षण मनोरे उभारण्यात आले असून, गर्दीतील चोरी व छेडछाडीच्या घटना टाळण्यासाठी साध्या वेशातील पोलीसही तैनात असणार आहेत. राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, गृहरक्षक दलाचे जवान, तसेच बीडीडीएस, क्यूआरटी, बॉम्ब शोधक आणि नाशक पथके सज्ज ठेवण्यात आली आहेत.

या सोहळ्यासाठी ४ अतिरिक्त पोलीस आयुक्त, १० पोलीस उपायुक्त, २७ सहाय्यक पोलीस आयुक्त, १५४ पोलीस निरीक्षक, ६१८ उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक, ६,२८६ पोलीस अमलदार, १,१०० होमगार्ड, राज्य राखीव दलाचे ९० जवानांचा समावेश आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार हे स्वतः बंदोबस्तावर लक्ष ठेवणार आहेत.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव