Canva
महाराष्ट्र

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय; दारू पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द

Swapnil S

पुणे : राज्यात आणि पुणे शहरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’च्या घटनांमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये जाणारे निष्पापांचे बळी ही पोलिसांपुढील डोकेदुखी ठरली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, दारू पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. पुणे पोलिसांच्या या निर्णयामुळे पुण्यात दारू पिऊन गाडी चालवल्यास परवाना रद्द केला जाणार आहे.

पुण्यातील बहुचर्चित कल्याणीनगर कार अपघात प्रकरणाने देशात एकच संताप उसळला होता. आरोपीला वाचविण्यासाठी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याचे सुरुवातीला दिसून आले होते. जनक्षोभ वाढताच त्याच यंत्रणांचा सूर आणि नूर पालटला. त्यानंतर या रविवारी पुण्यातील बोपोडीत हिट अँड रन प्रकरण घडले. फरसखाना ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकांना काही मद्यपींनी पेटवून दिल्याचे प्रकरण ताजे असताना आता पोलिसांनी याप्रकाराला आळा घालण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे जर आता कोणी चालक दारू पिऊन गाडी चालवताना आढळून आला, तर पहिल्यांदा त्याचे वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल. त्याच व्यक्तीने जर पुन्हा गुन्हा केला, तर सहा महिन्यापर्यंत त्याचा परवाना रद्द करण्यात येईल; मात्र तिसऱ्या वेळीही पुन्हा तीच व्यक्ती आढळून आली तेव्हा मात्र त्याचा वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) कायमस्वरूपी रद्द होणार, अशी माहिती पुणे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली आहे.

सहा महिन्यांत १६८४ जणांवर गुन्हे दाखल

दरम्यान, पुण्यात वाढणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्ह घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर पावले उचलायला सुरुवात झाली आहे. पुण्यात गेल्या सहा महिन्यांत १६८४ जणांवर ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापूर्वी दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर फक्त खटले दाखल करून कारवाई केली जात होती.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

पोलिसांवर हायकोर्ट संतापले; अतिरिक्त पोलीस आयुक्तांना हजर राहण्याचे आदेश

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?