महाराष्ट्र

Pune Porsche Accident case: बाल न्याय मंडळाचे ‘ते’ दोन सदस्य दोषी

Swapnil S

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला ३०० शब्दांचा निबंध लिहिण्याच्या अटी-शर्तीवर जामीन देण्याचा निर्णय बाल न्याय मंडळाच्या डॉ. एल. एन. धनावडे आणि के. टी. थोरात या दोन सदस्यांना भोवणार आहे.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दोघांना दोषी ठरवले असून राज्य सरकार त्यांच्यावरील कारवाईबाबत निर्णय घेणार आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास विभागाने प्रक्रियात्मक त्रुटी आणि गैरवर्तनाबद्दल दोषी धरून बाल न्याय मंडळाच्या या दोन सदस्यांविरुद्ध राज्य सरकारकडे अहवाल सादर केला आहे. यासंदर्भात पाच सदस्यीय समितीने दिलेल्या अहवालात या दोन्ही सदस्यांवर कडक कारवाई करण्याची शिफारस केली आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या दोन सदस्यांची अंतर्गत चौकशी सुरू होती.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत