महाराष्ट्र

EVM चोरी प्रकरण : निवडणूक आयोगाकडून गंभीर दखल, तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात स्ट्राँग रूममधून डमी ईव्हीएम मशीन चोरी झाल्याप्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पुरंदर तसेच संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तत्काळ निलंबित करून पुढील चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी समिती नेमण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

राज्यामध्ये १० डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ईव्हीएमबाबत जनजागृती व प्रसिद्धीचा कार्यक्रम सर्व जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर विधानसभा मतदारसंघाकरिता उपविभागीय अधिकारी पुरंदर यांचे मुख्यालय सासवड येथे आहे. तेथील तहसील कार्यालयातील स्ट्राँगरूममध्ये पुरंदर विधानसभा मतदारसंघातील ईव्हीएम जनजागृती कार्यक्रमासाठी वापरावयाच्या ४० ईव्हीएम यूनिट ठेवण्यात आल्या आहेत. सदर स्ट्राँगरूमकरिता सासवड पोलिस स्टेशनकडून सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात आलेली आहे. जिल्हाधिकारी, पुणे तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांच्या माहितीनुसार शनिवार किंवा रविवारी या ईव्हीएमपैकी एक कंट्रोल युनिट चोरीला गेल्याचे निदर्शनास आले होते. तसेच त्यासोबत कोरे पेपर रीम ५ व स्टेशनरी सुध्दा चोरीस गेलेली होती याची गंभीर दखल आयोगाने घेतली आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस