Pune : नऊ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेव्हिक्विक; महिलेविरुद्ध गुन्हा प्रातिनिधिक छायाचित्र
महाराष्ट्र

Pune : नऊ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेव्हिक्विक; महिलेविरुद्ध गुन्हा

पुण्यातील लोहगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील लोहगाव परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून एका महिलेने अवघ्या नऊ महिन्यांच्या पुतण्याच्या तोंडात फेव्हिक्विक ओतल्याचा आरोप असून, या अमानवी प्रकारामुळे बालकाच्या तोंडाला गंभीर अंतर्गत दुखापत झाली आहे. त्याच्यावर ससून रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या प्रकरणी अल्ताफ नबी शेख (३९) यांच्या फिर्यादीवरून लोहगाव पोलिसांनी सानिया शेख, रियाज इमाम हल्याळ आणि हाजी मलंग शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादीनुसार, ३१ जुलै रोजी दुपारी कौटुंबिक वादाच्या रागातून सानिया शेख हिने बालकाच्या तोंडात फेव्हिक्विक ओतले. हा प्रकार लक्षात येताच बालकाला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तक्रारीनुसार, घटनेबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी महिलेने बालकाच्या आईला धमकावल्याचा आरोप आहे. तसेच, रुग्णालयात आलेल्या अन्य आरोपींनीही पोलीस तक्रार करू नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले करत आहेत. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांवर आता शुल्क; केंद्रीय अर्थखात्याकडून अखेर संसदेत विधेयक सादर

WhatsApp वापरकर्त्यांच्या वयाची पडताळणी होणार; डीपीडीपीसारख्या कायद्यांचे पालन करण्यासाठी चाचणी करणार

भेसळ प्रकरणाशी संबंध सिद्ध झाल्यास निवृत्ती; माजी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे विरोधकांना खुले आव्हान

दहिसर, मीरा-भाईंदर मेट्रो वर्षअखेरीस सेवेत? अंतिम टप्प्याची चाचणी सुरू; ९० टक्के काम पूर्ण

Pune : आळंदीत १५० कोटींच्या महाघोटाळ्याचा पर्दाफाश; पोलिसांनी आंतरराज्यीय सायबर रॅकेट केले उद्ध्वस्त