महाराष्ट्र

राधानगरी धरणाचे पाच स्वयंचलित दरवाजे उघडले, नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा

पावसाचा जोर वाढल्यास अजून काही धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता आहे.

Swapnil S

शेखर धोंगडे

कोल्हापूर: राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे गुरुवारी सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांपर्यंत उघडले होते तर सायंकाळी साडेचार वाजता एक स्वयंचलित दरवाजा असे एकूण पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आल्याची माहिती भोगावती पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण पारकर यांनी दिली.

अधिक माहिती अशी की राधानगरी धरण परिसरात पावसाने धुमाकूळ घातला असल्यामुळे राधानगरी धरण गुरुवारी सकाळी पूर्ण क्षमतेने भरले. यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले तर सायंकाळी एक स्वयंचलित दरवाजा मिळून एकूण पाच स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले आहेत. सकाळच्या सुमारास धरणाची पाण्याची पातळी ३४७. ५० फूट तर पाणीसाठा ८२८०.८५ दशलक्ष घनफूट व धरण १०० टक्के भरले असून धरण परिसरात सकाळी सहा वाजता २०२ मिमी पाऊस झाला. पाच स्वयंचलित दरवाज्यातून प्रति सेकंद ७१४० क्यूसेक पाण्याचे विसर्ग होत आहे तर, बीओटी विद्युत ग्रहामधून १५०० क्यूसेक असा एकूण ८६४० क्यूसेक्स पाणी नदीपात्रामध्ये विसर्ग करण्यात आले आहे. नदीपात्रामध्ये पाण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे नदीकडच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असे आव्हान भोगावती पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण पारकर व राधानगरीच्या तहसीलदार अनिता देशमुख यांनी केले आहे.

पावसाचा जोर वाढल्यास अजून काही धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाण्याची शक्यता भोगावती पाटबंधारे विभागाचे अधिकारी प्रवीण पारकर व तहसीलदार अनिता देशमुख यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी