सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी; मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण 
महाराष्ट्र

सलग सुट्ट्यांमुळे रायगडच्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची गर्दी; मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शनिवार-रविवारासह प्रजासत्ताक दिनाची सुट्टी लागून आल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत.

Swapnil S

धनंजय कवठेकर / अलिबाग

सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर पुन्हा एकदा पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. शनिवार-रविवारासह प्रजासत्ताक दिनाची सुट्टी लागून आल्याने रायगड जिल्ह्यातील बहुतांश पर्यटनस्थळे पर्यटकांनी गजबजून गेली आहेत. अलिबाग, मुरूड, नागाव, काशिद, मांडवा, आवास, किहीम, दिवेआगर, श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर येथील समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची वर्दळ पाहायला मिळत आहे.

अलिबाग व मुरूड ही पर्यटकांची नेहमीच पसंतीची ठिकाणे असून, मांडवामार्गे जलप्रवास करत अनेक पर्यटक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. सागरी प्रवासाचा आनंद घेत पर्यटकांनी निसर्गसौंदर्याचा मनमुराद आस्वाद घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. काही पर्यटकांनी दोन-तीन दिवस मुक्काम करण्यासाठी आगाऊ नियोजन केल्यामुळे हॉटेल्स, रिसॉर्ट्स, लॉज तसेच होमस्टे येथे मोठ्या प्रमाणावर खोल्यांचे आरक्षण झाले असल्याची माहिती व्यावसायिकांनी दिली. मात्र, काही नागरिकांनी वनडे पिकनिकला अधिक पसंती दिल्याचेही आढळून आले.

पर्यटनस्थळांवर सुरक्षितता व आवश्यक सुविधांसाठी व्यावसायिकांकडून तयारी करण्यात आली असून, येत्या तीन दिवसांत सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटक रायगड जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर अलिबाग येथे समुद्रकिनारी चार दिवसीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे पर्यटकांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एकूणच सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी कोकण किनारपट्टीवर पर्यटकांची गर्दी वाढली असून, यामुळे स्थानिक पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण

समुद्रस्नानासोबतच एटीव्ही राइड, जेट स्की, बनाना राइड यांसारख्या विविध वॉटर स्पोर्ट्सकडे पर्यटकांचा मोठा ओढा दिसून आला. या साहसी खेळांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी रांगा लावल्या होत्या. तसेच उंटसवारी व घोडागाडीमुळे लहान मुलांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर महाराष्ट्राच्या ‘गणेशोत्सव’ चित्ररथाची मोहिनी; संस्कृती, परंपरा आणि स्वावलंबनाचे दर्शन, Video व्हायरल

Republic Day 2026 : कर्तव्य पथावर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पराक्रमाचं दर्शन; लढाऊ विमानांची दिमाखदार परेड, पाहा Video

Republic Day 2026 : शिवाजी पार्क ते बीएमसी मुख्यालय; मुंबईत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, Video

Mumbai : परळ आगाराच्या विश्रांतीगृहात आढळल्या दारूच्या बाटल्या; बस आगाराची स्वतंत्र विभागीय चौकशी

मीरा-भाईंदर पालिकेच्या महापौर व उपमहापौरांची ३ फेब्रुवारीला निवड