रायगड : महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ शहर आणि ग्रामीण भागात तसेच कोकणात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर दरडी, पूल खचणे, रस्त्याचे भराव, वीज पोल कोसळणे, तारा तुटणे, लोकांच्या घरात पाणी शिरणे, वाहतुककोंडी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा सायंकाळपर्यंत बंद होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. सुराज्याची राजधानी किल्ले रायगडावर ढगफुटी झाली होती. धुवांधार पावसात पर्यटक, शिवप्रेमी गडावर अडकून पडले होते; मात्र ते
बालंबाल सुरू असून, नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. ठिकठिकाणी पूर आले आहेत. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे सोमवार, दि. ८ जुलैपासून रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथील मार्गावर बॅरिकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. किल्ले रायगडावर ढगफुटीत अडकलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून उतारण्यात आले. रोपवे प्रशासनाकडूनही रोपवे किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे.
अलिबागमध्ये पूर
रात्रीपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील विविध गावातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्याचे कपडे, राशन इत्यादीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून मल्याण गावातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करून लोकांना नुकसानभरपाई भरून देण्याची हमी दिली. बचावले रायगडसह कोकणात पावसाचा कहर