महाराष्ट्र

अल्पवयीन मुलीवर वडील, काका, चुलत भावाकडून बलात्कार

पुण्यातील हडपसरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

Swapnil S

पुणे : पुण्यातील हडपसरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर चक्क वडील, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पुणे ही शिक्षणाची पंढरी आणि संस्कृती जपणारे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात घडत असलेल्या घटनांमुळे पुण्याची संस्कृती लयाला गेली की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुण्यातील हडपसरमध्ये एका १३ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे खुद्द मुलीचे वडील, काका आणि चुलत भावाने हा बलात्कार केल्याची तक्रार पीडित मुलीच्या आईने केली आहे. पीडित मुलीने यासंदर्भात आईला माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार जुलै २०२२ ते जून २०२४ यादरम्यान घडला आहे.

पीडित मुलगी तिची आई, वडील, काका व चुलत भाऊ यांच्यासह एकत्र कुटुंबात मांजरी भागात राहत असून हे कुटुंबीय इतर राज्यातून येथे राहण्यास आले आहे. पीडित मुलीवर जुलै २०२२ मध्ये तिच्या चुलतभावाने राहत्या घरामध्ये बलात्कार केला. त्यानंतर भावाने तिला ठार मारण्याची धमकीही दिली होती, तर जानेवारी २०२४ मध्ये पीडित तरुणीच्या काकाने रात्रीच्या वेळी फायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली असताना तिच्या वडिलांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी, पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचेही आईने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांकडून तपास सुरू आहे.

मराठवाड्यात संततधार पाऊस; गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

"हास्यास्पद नाटकं करून सत्य लपवता येत नाही"; संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानवर भारताचा घणाघात

Maharashtra Rain : राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; हवामान खात्याचा इशारा

गायक झुबीन गर्ग मृत्यू प्रकरण : आयोजक व मॅनेजरवर लुकआउट नोटीस जारी; मुख्यमंत्री सरमा म्हणाले, अन्यथा...

MPSC ची राज्यसेवा परीक्षा पुढे ढकलली